सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ आहे. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. प्राण्यांबद्दल नेटकऱ्यांना कायमच कुतुहूल असतं. प्राणी कसे जगतात, काय करतात याबाबत उत्सुकता असते. त्यात साप म्हटलं की, उत्सुकता शिगेला पोहोचते. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात एक विषारी साप सरड्याची शिकार करताना दिसत आहे. विषारी साप जेव्हा शिकार करतात तेव्हा तिथे अन्य प्राणी थांबण्याऐवजी जीव वाचवून पळून जाताना दिसतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक विषारी साप आपल्या शिकारी सरड्याला पकडताना दिसत आहे. तर सरड्याचा दुसरा साथीदार त्याचा जीव वाचवून पळण्याऐवजी आपल्या साथीदाराला वाचवताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये, एक साप छताला लटकलेला दिसत आहे. तसेच भिंतीवर धावत असलेल्या सरड्याला पकडतो, यादरम्यान दुसरा सरडा येतो आणि आपल्या साथीदाराचा जीव वाचवण्यासाठी सापावर हल्ला करतो. यादरम्यान सरडा सापाचे तोंड पकडून चावताना दिसतो, त्यामुळे सापाची पकडही सैल होते आणि सापाच्या तावडीतून सरडा निसटतो.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले असून लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरी ही लढाई वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. तसेच या व्हिडीओखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.