सोशल मीडियावर रोज नवा व्हिडिओ गाजत असतो. त्यात प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतात. सापांचे व्हिडिओ लोकं मोठ्या उत्सुकतेने पाहात असतात. कारण साप म्हटलं की भिती असते. चावला तर काय? असे विविध प्रश्न मनात येत असतात. गावाकडे गेलं की शेतात जाताना विशेष काळजी घ्यावी लागते. आता असाच एका सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका यूजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हे स्नेक हाऊसमधील दृश्य असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. त्यात एक साप ठेवण्यात आला आहे. बऱ्यापैकी लांब असलेला साप अचानक स्वतःला गिळू लागतो असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तो त्याच्या शरीराचा मधला भाग तोंडात दाबू लागतो आणि हळू हळू आत गिळण्याचा प्रयत्न करतो. मात्र, सापाचा हा प्रयत्न व्यर्थ जात असल्याचं दिसत आहे.

सापाचा हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर कमेंट्स आणि लाइक्स करत आपल्या खात्यावर शेअर करत आहेत. या सापानं असं करण्यामागे नक्की कोणतं कारण आहे?, याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.