कलेला कोणतेही बंधन नसते. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत, गरिबांसासून श्रीमंतापर्यंत, साधा राहणीमान असलेल्या व्यक्तीपासून विलासी जीवन जगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे कला असते. जो कला जपतो तोच खरा कलाकार. अनेकदा लोक इतरांबाबत त्यांच्या कपडे, राहणीमान, भाषा यावरून मत तयार करतात पण प्रत्यक्षात तो व्यक्ती अत्यंत वेगळा असू शकतो. कलाकरांच्या बाबतीत अनेकदा असे होते की त्यांच्या राहणीमान पाहून लोक त्यांच्या कलेबाबत मत तयार करतात. पण खरा कलाकार या सर्व गोष्टींना बांधील नसतो हे सिद्ध करणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. अत्यंत साधे राहणीमान असलेल्या आप्पाची अप्रतिम कला पाहून नेटकरी चक्रावले आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की,”एक व्यक्ती ज्यांनी पांढरे धोतर आणि कुर्ता परिधान केला आहे, डोक्यावर गुलाबी रंगाचे पागोटे डोक्यावर बांधले आहे. हा व्यक्ती एका स्टेजवर बसलेला दिसत असून समोर प्रेक्षक बसलेले दिसत आहे. व्हिडिओ पाहताच कोणालाही वाटेल की हा कलाकार एखादी मराठी गाणे गाणार आहे पण प्रत्यक्षात घडते वेगळेच काहीतरी.
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण व्हायरल व्हिडीओमधील व्यक्ती अरजित सिंगने गायलेले प्रसिद्ध दिल संभल जा जरा हे गाणे गातो तेही अत्यंत सुंदर आवाजामध्ये. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ढोलकीच्या तालावर “दिल संभल जा जरा” तो गाणे गाताना दिसत आहे. ढोलकी वादकांनेही इतकी सुंदर ढोलकी वाजवली आहे की नेटकऱ्यांना विश्वास बसत नाही.
व्हिडिओ इंस्टाग्रामवर prashant_takik_official नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले आहेत.
व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, व्हिडीओला एक वर्ष पूर्ण झाले तरी अजूनही तितकंच प्रेम तुम्ही देत आहात. मनापासून धन्यवाद.”
व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आप्पाचे आणि ढोलकी वादकाचे कौतुक केले आहे.
एकाने कमेंट केली की,”ढोलकी वाल्याला ५ किलो रेवडी फुटाणे “
दुसऱ्याने कमेंट केली की,”ढोलकी ने राडा केला राव”
तिसऱ्याने कमेंट केली की,”आप्पाचा विषय लई हार्ड आहे”