पुण्यातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रोज सकाळ संध्याकाळ चौकांमध्ये मोठी वाहतूक कोंडी होत असते. याला जबाबदार फक्त पुण्यातील वाढती लोकसंख्या नाही तरी अपुऱ्या मुलभूत सुविधा आणि बेशिस्त वाहनचालक आहेत. पुण्यातील वाढत्या लोकंसख्येला पुरेल इतकी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि पायाभूत सुविधा पुरवण्याचे काम प्रशासन करत आहे पण बेशिस्त वाहनचालकांचा शिस्त लावणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. पुण्यात बेशिस्त वाहनचालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. साध्या सोप्या वाहतूक नियमांचे पालन देखील या बेशिस्त चालकांना करता येत नाही. कधी हेल्मेट वापरणार नाही, कधी सिग्नलला थांबणार नाही, कधी ट्रिपल सीट बाईक चालवताना अनेकदा हे बेशिस्त वाहनचालक दिसतात. बेशिस्त वाहन चालकांना वारंवार सूचना सांगून, समज देऊन आणि दंडाच्या पावत्या फाडून आता वाहतूक पोलीसही वैतागले आहेत. अशाच एका वैतागलेल्या वाहतूक पोलिसाने या बेशिस्त वाहनचालकांना समजावण्यासाठी चक्क गाणे गायले आहे ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.
व्हिडिओ इंस्टाग्रामवर ak_police_official या पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये गाण्याचे बोल लिहिले आहेत” आता कसं सांगू पुणेकर सिग्नल नका तोडू बरं, ट्रिपल शीट रॉंग साईड नि तो बघ चाललाय छपरी कसं”
व्हिडीओमध्ये वाहतूक पोलिसाने या गाण्याला बियर या तमिळ भाषेतील गाण्याची चाल दिली आहे. बियर हे गाणे धिबू निनान थॉमस यांनी गायले आहे. डिझेल अल्बममधील बियर सॉन्ग २०२३ मध्ये रिलीज झाला होता. वाहतूक नियमांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी हटके स्टाईल वापरली आहे. hemaharashtrapolice देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, “हे भारी होते”
दुसऱ्याने कमेंट केली की,” सिग्नल तोडून आम्ही जात नाही पुढं, तासभर थांबावं लागतंय ट्रॅफिकमुळे, मुंबईही-पुण्यातही सातारा तेवढा सोडला तर “
तिसऱ्याने कमेंट केली की,”तुमची समाज प्रबोधन करण्याची स्टाईल माझी आवडती झालीय सर ,एक नंबर “
आतिश खराडे हे पुणे वाहतूक पोलिसमध्ये कार्यरत असून सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या व्हिडीओच्या माध्यामातून ते नागरिकांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देतात. आतिश यांची चर्चेत येण्याचे ही पहिलीच वेळ नाही. या आधी त्यांचे अनेक व्हिडिओ चर्चेत आले आहेत.