पुण्यातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रोज सकाळ संध्याकाळ चौकांमध्ये मोठी वाहतूक कोंडी होत असते. याला जबाबदार फक्त पुण्यातील वाढती लोकसंख्या नाही तरी अपुऱ्या मुलभूत सुविधा आणि बेशिस्त वाहनचालक आहेत. पुण्यातील वाढत्या लोकंसख्येला पुरेल इतकी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि पायाभूत सुविधा पुरवण्याचे काम प्रशासन करत आहे पण बेशिस्त वाहनचालकांचा शिस्त लावणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. पुण्यात बेशिस्त वाहनचालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. साध्या सोप्या वाहतूक नियमांचे पालन देखील या बेशिस्त चालकांना करता येत नाही. कधी हेल्मेट वापरणार नाही, कधी सिग्नलला थांबणार नाही, कधी ट्रिपल सीट बाईक चालवताना अनेकदा हे बेशिस्त वाहनचालक दिसतात. बेशिस्त वाहन चालकांना वारंवार सूचना सांगून, समज देऊन आणि दंडाच्या पावत्या फाडून आता वाहतूक पोलीसही वैतागले आहेत. अशाच एका वैतागलेल्या वाहतूक पोलिसाने या बेशिस्त वाहनचालकांना समजावण्यासाठी चक्क गाणे गायले आहे ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा