रशियन सुमो कुस्तीपटू ‘जगातील सर्वात बलवान मुल’ म्हणून ओळखला जातो; तो आता नाही. होय, जेव्हा तो नऊ वर्षांचा होता, तेव्हा त्याचे वजन १४६ किलो होते परंतु वयाच्या २१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. झंबुलत खातोखोव्हने (Dzhambulat Khatokhov) आपल्या तरुण वयात अनेक यश संपादन केले होते. जगभरातील लोक त्याला सर्वात शक्तिशाली बालक म्हणत, पण त्याचे मित्र त्याला ‘ग्लॅडिएटर’ म्हणत. वयाच्या तिसर्या वर्षी त्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्या वयात झंबुलतने ‘जगातील सर्वात बलवान किड’ हा किताब पटकावला.
वयाच्या तिसऱ्या वर्षी पटकवला किताब
वयाच्या तिसऱ्या वर्षी, झंबुलत खातोखोव्हचे वजन ४८ किलो होते. त्यांच्या नावावर गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची नोंद झाली. जन्मावेळी झंबुलतचे वजन केवळ २.८९ किलो होते, परंतु वयाच्या अवघ्या एका वर्षी त्याचे वजन सुमारे १३ झाले. वजन वाढण्याची प्रक्रिया थांबली नाही, जसजसे वय वाढू लागले, तसतसे मुलाचे वजनही वाढू लागले. जेव्हा तो ६ वर्षांचा झाला तेव्हा त्याचे वजन ९५ किलो झाले. पुढे जेव्हा तो ९ वर्षांचा झाला तेव्हा त्याचे वजन १४६ किलो झाले.
(हे ही वाचा: उडणाऱ्या हरणाला कधी बघितलं आहे का? राष्ट्रीय उद्यानातील Video Viral)
सुमो कुस्तीच्या अनेक स्पर्धा जिंकल्या
वाढत्या वजनामुळे, झंबुलतला सुमो कुस्तीमध्ये रस येऊ लागला आणि स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागला. त्याचे प्रशिक्षक खासन तेस्वाझुकोव्हने त्याला लढण्यासाठी तयार केले, परंतु प्रशिक्षणादरम्यान त्याच्या वाढत्या वजनाबद्दलही तो चिंतित होता कारण जेव्हा झंबुलाट १७ वर्षांचा झाला तेव्हा त्याचे कारण २३० किलो होते. डॉक्टरही त्यांना वजन कमी करण्याचा सल्ला देऊ लागले नाहीतर त्यांना अनेक आजार होऊ शकतात. चिंतेनंतर मुलाने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच त्याने दीड वर्षात सुमारे १७६ किलो वजन कमी केले.
(हे ही वाचा: सिंहाने पाणी पीत असलेल्या हरणावर केला हल्ला आणि…;बघा व्हायरल व्हिडीओ)
मुलाच्या आईवर झाले अनेक आरोप
झंबुलतने त्याच्या कुस्तीच्या अनेक स्पर्धा जिंकल्या. मुलाला सुमो रेसलर बनवण्यासाठी लहानपणी स्टेरॉईडची औषधे दिल्याचा आरोपही मुलाच्या आईवर करण्यात आला आहे. तथापि, आईने ही गोष्ट साफ नाकारली आणि विचारले की आई आपल्या मुलाशी असे करू शकते का? तिने सांगितले की जेव्हा मूल ५ वर्षांचे होते, तेव्हा तिला वैद्यकीय चाचणीसाठी मॉस्कोला नेण्यात आले होते, परंतु तपासणीत सर्व काही सामान्य होते आणि ती पूर्णपणे निरोगी आहे. त्या म्हणाल्या की, ‘माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे आहेत आणि मी माझ्या मुलासोबत असे कधीही करू शकत नाही.’