आपल्या धर्मात गुरूला विशेष महत्त्व दिले जाते. गुरूचा आशीर्वाद असेल तर एखादी व्यक्ती असाध्य गोष्टीही साध्य करू शकते. आयुष्यात यश मिळवण्यासाठी एक योग्य मार्गदर्शक आपल्या पाठीशी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण हे मार्गदर्शक आपले हितचिंतकच असतील असे नाही. अनेकदा आपल्याला कमी लेखणारे लोक सुद्धा आपल्याला चांगलं काम करण्याची प्रेरणा देतात. याचाच प्रत्यय सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमधून आपल्याला येऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्विटरवर एका महिलेने व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा एक स्क्रीनशॉट शेअर केला. या स्क्रीनशॉटमध्ये ती तिच्या शिक्षिकेला, शाळेत नेहमी तिची बदनामी केल्याबद्दल आणि ती भविष्यात काहीही करू शकणार नाही असे बोलल्याबद्दल चोख उत्तर दिले आहे. “दोन वर्षांपूर्वी, मी आणि माझ्या मित्राने आमचा निकाल जाहीर होईल त्या दिवशी आमच्या शिक्षिकेला मेसेज पाठवायचे ठरवले,” या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले.

शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे खूप महत्वाचे आहे. दुर्दैवाने, असेही काही शिक्षक आहेत ज्यांना असे वाटते की विद्यार्थ्यांशी वाईट वागून ते त्यांना कठोर परिश्रम करण्यास प्रवृत्त करतात. मात्र, ते खरे नाही. चांगुलपणा दाखवून एखाद्याला अधिक चांगले करण्यास आपण प्रवृत्त करू शकतो.

CCTV : ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’, अपघाताचा Viral Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स…

शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये काही मेसेज आहेत. संबंधित शिक्षिकेने कशाप्रकारे आपली बदनामी केली आणि आपण आयुष्यात काहीच करू शकणार नाही असे हिणवले, याबद्दल त्या मुलीने आपले मत मांडले आहे. पुढे तिने लिहले की हा मेसेज धन्यवाद करण्यासाठी केला नसून आता ती आयुष्यात किती यशस्वी झाली आहे हे सांगण्यासाठी केला आहे. यामुलीने आपल्या शिक्षिकेला काय मेसेज केला आहे पाहूया.

अखेरीस तिने आपल्या मेसेजमध्ये लिहलंय, “पुढील वेळी, कृपया लोकांशी दयाळूपणे वागण्याचा प्रयत्न करा. विशेषत: जे विद्यार्थी तुमची मदत घेतात. त्यांच्याशी प्रेमाने वागा.” हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर अनेक लोकांनी आपले अनुभव शेअर केले आहेत.

हा तरुण लोकांना मिठी मारून तासाला कमावतो ७ हजार रुपये! जाणून घ्या काय आहे प्रकरण

Optical Illusion: ‘या’ फोटोमध्ये लपला आहे वाघ; तुम्हाला सापडला का?

दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शुक्रवारी २२ जुलै रोजी इयत्ता बारावी आणि दहावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले. दहावी आणि बारावीचे निकाल एकाच तारखेला जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The student gave a perfect answer to the teacher who said you will not be able to do anything in life the post went viral on social media pvp