Viral Video : साप, अजगर हे शब्द जरी उच्चारले तरी अंगावर काटा येतो. मानवी वस्तीत अनेकदा साप किंवा अजगर आढळून येतात. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाळेत मुले मैदानावर खेळत असताना अचानक भलामोठा अजगर त्यांच्यासमोर येतो. पुढे जे काही होतं, ते पाहून तुमच्याही अंगावर शहारा येईल.
शाळेत मुलांचे खेळण्याचे ठिकाण म्हणजे मैदान. शाळेचे मैदान हे स्वच्छ आणि सुंदर असते. या मैदानावर एखादा लहान किडा सुद्धा स्पष्टपण दिसतो पण विचार करा की या मैदानावर शाळेतल्या चिमुकल्यांना भला मोठा अजगर दिसला तर काय होईल? हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की शाळेतील विद्यार्थी मैदानावर खेळत असतात अचानक मैदानावर भला मोठा अजगर विद्यार्थ्यांना दिसतो आणि या अजगराला पाहताच विद्यार्था सैरावैरा पळत सुटतात. तेव्हा सर्पमित्र तिथे येतो पण अजगर शाळेच्या शेजारी झाडा झुडपांमध्ये लपलेला असतो. तेव्हा सर्पमित्र इतर लोकांच्या मदतीने अजगराला पकडतो आणि पुन्हा शाळेत आणतो आणि विद्यार्थांना अजगराची एक झलक दाखवतो. त्यानंतर या अजगराला व्यवस्थित बांधून घेऊन जातो आणि निर्सगाच्या सानिध्यात सोडतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

हेही वाचा : “तुझ्यासाठी खाऊ आणते!” फिरायला आलेल्या आजीचा परतुंडाबरोबर गोड संवाद, VIDEO होतोय व्हायरल

murliwalehausla24 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “शाळेत खेळताना मुलांना दिसला भलामोठा अजगर”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान सर” तर एका युजरने लिहिलेय, “मुरलीसर तुम्ही आमच्यासाठी देव आहात.” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप छान काम करताय, असेच करत राहा..” अनेक युजर्सनी सर्पमित्र यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

या सर्पमित्राचे नाव मुरली लाल आहेत. हे अतिशय लोकप्रिय आहेत. आपल्या हाताने ते विषारी सापांना पकडतात. हा व्हिडीओ सुद्धा त्यांनी त्यांच्या अकाउंटवरुन शेअर केला आहे. १.५ मिलिअन लोकं त्यांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The students saw a large python while playing in school ground shocking video goes viral ndj