सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ शाळेशी संबंधित असतात. ज्यामध्ये शाळेतील अनेक गंमती जमती आपणाला पाहायला मिळतात. असे व्हिडीओ पाहून आपल्यालाही बालपणीचे दिवस आठवतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला तुमच्या शाळेतील दिवस आठवतील.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन विद्यार्थ्यांना शिक्षकांनी एकमेकांना शिक्षा करायला लावल्याचं पाहायला मिळत आहे. हे दोघे एकमेकांना ज्याप्रमाणे शिक्षा करत आहेत ते पाहून तुम्हालाही हसू आवरणं कठीण होईल यात शंका नाही. हा व्हिडीओ एका वर्गातील असून व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, वर्गात अनेक विद्यार्थी आहेत. यातील दोघांना शिक्षकांनी उभं केलं आहे. त्यांनी वर्गात दंगा केल्यामुळे किंवा एकमेकांशी भांडल्यामुळे शिक्षकांनी त्यांना शिक्षा केली असावी असा अंदाज लावला जात आहे.
व्हिडीओमध्ये वर्गातील इतर विद्यार्थी त्यांच्याकडे पाहत आहेत. यावेळी उभे राहिलेले विद्यार्थी अचानक एकमेकांना चापट मारतात. जे पाहून इतर विद्यार्थी जोरजोराने हसताना दिसत आहे. हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा मजेशीर व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एकमेकांना शिक्षा करायला सांगितलं” हा व्हिडीओ आतापर्यंत ३३ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेक नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी अशी शिक्षा आम्हालाही अनेकदा करायला लावल्याचं लिहिलं आहे. तर काहींनी व्हिडीओ पाहून शाळेतील जुने दिवस आठवले, असं म्हटलं आहे.