आफ्रिकन देश घाना येथील एका महिलेला अन्नामध्ये एक विचित्र गोष्ट आढळली. तिच्या मते की हा पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टचा (पेनिस) तुकडा आहे. तिला हा तुकडा तुओ जाफी (Tuo Zaafi) नावाच्या डिशमध्ये सापडला, जो तिने स्ट्रीट फूड विक्रेत्याकडून विकत घेतला होता.महिलेला अन्नामध्ये ही गोष्ट मिळताच तिने त्याचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या व्हिडीओंमध्ये एका महिलेला संशयास्पद वस्तू दाखवताना दिसते. तिच्या फूड पॅकेटमध्ये हा पदार्थ सापडला. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिला कशी मांसाच्या तुकड्यासारखी वस्तू दाखवत आहे.

( हे ही वाचा: दुसऱ्या लग्नासाठी मिरवणूक घेऊन नवरदेव पोहोचला मुलीच्या घरी, पहिली बायको समोर उभी दिसली, मग.. )

तुओ जाफी नावाचा डिश घानाचा मुख्य खाद्य आहे असे सांगण्यात आले. हे अन्नधान्य आणि मांसापासून बनवलेले स्ट्रीट फूड आहे, जे सर्वत्र स्टॉलवर सहज उपलब्ध आहे. महिलेने तेथून ते विकत घेतले होते. पण जेव्हा तिला खाद्यपदार्थात ‘लिंगासारखी वस्तू’ दिसली तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला.

( हे ही वाचा: Google Year in Search 2021: यावर्षी भारतीयांनी इंटरनेटवर सगळ्यात जास्त काय सर्च केलं? जाणून घ्या )

व्हिडीओमध्ये ती महिला लोकांना विनंती करत आहे की, स्ट्रीट फूड खाताना त्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करावे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत. कुणी घृणास्पद म्हटले, तर कुणी महिलेला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला.

( हे ही वाचा: पाकिस्तानच्या ड्रायव्हरने दही खरेदीसाठी थांबवली ट्रेन, VIDEO झाला व्हायरल मग… )

मात्र, घानामध्ये असे घृणास्पद खाद्यपदार्थ सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१६ मध्ये अकौसा नावाच्या महिलेला तिच्या जेवणात ‘लिंगासारखा मांसाचा तुकडा’ सापडला होता. घानामधील अक्रा येथे ही घटना घडली. एका वृत्तानुसार, अकोसा यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि मांसाच्या तुकड्याची डीएनए चाचणी करण्यास सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The substance that the woman found in the meal you will go crazy watching video ttg