असे म्हटले जाते की एखादी व्यक्ती त्याच्या मेहनतीने कोणतेही पद मिळवू शकते. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या व्यक्तीच्या मुलीने हे सिद्ध केले आहे. पेट्रोल पंप कस्टमर अटेंडंटची मुलगी आर्या हिने तिच्या मेहनत आणि समर्पणाच्या बळावर आयआयटी कानपूर मध्ये प्रवेश मिळवला आहे.इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड चे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य यांनी ही माहिती दिली. आपल्या ट्विटरवर फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, ‘इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या राजगोपालन यांची मुलगी आर्या हिची प्रेरणादायी कथा मी शेअर करत आहे. आर्यने आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश मिळवून आम्हाला अभिमान वाटला आहे. आर्यला शुभेच्छा.
शिष्यवृत्ती द्याची मागणी
श्रीकांत माधव वैद्य यांच्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. आयआयटीमध्ये प्रवेश मिळवलेल्या आर्याला शुभेच्छाही देत आहेत. यासोबतच ट्विटर वापरकर्ते तिला शिष्यवृत्ती देण्याची मागणी करत आहेत.
आणखीन एक प्रेरणादायी कथा
अशीच कथा मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील रहिवासी अनमोल अहिरवार यांचीही आहे, ज्यांचे कुटुंब झोपडपट्टीत राहते, परंतु असे असूनही त्यांनी आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. अनमोलचे आई-वडील चहाची गाडी चालवतात, पण मुलाची आयआयटी कानपूरमध्ये निवड झाली.चहाच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्नातून, ते घराचा खर्च चालवतात. पण मुलाच्या अभ्यासाची ओढ पाहून त्याच्या घरच्यांनी अभ्यासात कोणतीही कमतरता येऊ दिली नाही. अनमोलचे आईवडील सुशिक्षित नाहीत, पण त्यांनी आपल्या मुलाला उच्च शिक्षण मिळावे यासाठी अहोरात्र मेहनत केली.