भारत हा वेगवेगळ्या संस्कृतींनी नटलेला देश आहे. येथील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या भाषा आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या बोलीभाषा बोलल्या जातात. असे असले तरीही संस्कृत ही आपल्या देशातील सर्व भाषांची माता मानली जाते. मात्र बदलत्या काळानुसार ही भाषा लोप पावत चालली असून केवळ श्लोक आणि मंत्रांमध्येच या भाषेचा वापर होत असल्याचे आपण पाहू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी बंगळुरू राज्यात एक टॅक्सी चालक प्रवाशांबरोबर संस्कृतमध्ये बोलत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. असाच एक नवा व्हिडीओ दिल्ली येथून समोर आला आहे. या चालकाला अस्खलित संस्कृत बोलताना पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत.

या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या टॅक्सीचालकाचे नाव अशोक असून तो उत्तरप्रदेशातील गोंड जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याला संस्कृतमध्ये बोलणे फार आवडते. दरम्यान हा व्हिडीओ नवी दिल्लीच्या इंडिया गेट परिसरात शूट करण्यात आला आहे. हा चालक संस्कृतमध्येच त्याचे नाव आणि तो कुठे राहतो याबद्दल सांगत आहे.

शांत झोप लागत नाही? आनंद महिंद्रा यांनी सांगितला पत्नीने दिलेला अजब सल्ला; ट्वीट Viral

हा व्हिडीओ लक्ष्मी नारायण बी.एस. या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून तो आतापर्यंत अडीच लाखांहूनही अधिकवेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, “आज सकाळी दिल्लीतील या टॅक्सीचालकाने माझ्याबरोबर संस्कृत भाषेतून संवाद साधला.” सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Viral Video: दोन बैलांमध्ये झाली खतरनाक झुंज; मारामारी करत घरात घुसले आणि…; पाहा शेवटी कोण जिंकलं

संस्कृत भाषेत संवाद साधणारा हा टॅक्सीचालक नेटकऱ्यांना फारच आवडला आहे. ते हा व्हिडीओ इतर प्लॅटफॉर्म्सवर शेअर करत आहेत, त्याचबरोबर या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया देऊन चालकावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एका युजरने म्हटलंय, “संस्कृत मनाला प्रसन्न करते.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The taxi driver from delhi communicates with passengers in fluent sanskrit viral video won everyone hearts pvp
Show comments