Viral News: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर नेहमीच विविध पोस्टर, शाळेतील मुलांच्या पेपरातील उत्तरं, गाड्यांच्या मागचे हटके डायलॉगही प्रचंड व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत. सध्या अनेकदा सोशल मीडियावर व्हॉट्सअॅप चॅट्सदेखील व्हायरल होत असतात, ज्यातील मजेशीर चॅट प्रचंड चर्चेत येतात. अशातच आता एका शिक्षक आणि विद्यार्थ्याचे चॅट व्हायरल होत आहे, जे वाचून तुम्हीही पोट धरून हसाल.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शालेय दिवस खूप अनमोल असतात. शाळेतील शिक्षक, त्यांचा मार, त्यांची शिकवणी सर्व गोष्टी कधीही न विसरण्यासारख्या आहेत. नुकताच शिक्षक दिन पार पडला. यानिमित्त अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षकांचा सन्मान केला जातो, त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका शिक्षक आणि विद्यार्थ्याचे गमतीशीर चॅट्स पाहायला मिळत आहे.
या व्हायरल फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावर शिक्षक त्याला धन्यवाद म्हणतात. त्यानंतर विद्यार्थी शिक्षकाला त्यांचा फोटो पाठवण्यासाठी सांगतो, यावर शिक्षक त्याला का? असं विचारतात. यावर तो विद्यार्थी सर तुमचा स्टेटस ठेवायचा आहे असं म्हणतो. यावर त्याचे शिक्षक खूप गमतीशीर उत्तर देतात. ते म्हणतात की, “राहूदे बाळा, लोकांना जर कळालं की, तू माझा विद्यार्थी आहेस तर माझा क्लासच बंद होईल.” सध्या हे चॅट खूप व्हायरल होत आहे.
हा फोटो X (ट्विटर) वरील @Marwadi या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर नेटकरीही अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “सर तुला चांगलंच ओळखतात.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “सर जोमात आणि विद्यार्थी कोमात”, तर आणखी काही युजर्स यावर हसताना दिसत आहेत.
हेही वाचा: खतरनाक! बैलाला थांबवणं पडलं महागात, थेट शिंगाने उडवलं; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
पाहा व्हिडीओ:
दरम्यान, यापूर्वीदेखील लग्नपत्रिकेचा एक फोटो व्हायरल झाला होता; ज्यात लग्नात कृपया दारू पिऊ नका, असा मेसेज लिहिण्यात आला होता. ही हटके पत्रिका सोशल मीडियावर खूप चर्चेत आली होती. त्याशिवाय याआधी एका मुलाचा शाळेतील पेपरचा फोटोदेखील व्हायरल झाला होता.
© IE Online Media Services (P) Ltd