छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहे. भारतीय इतिहासातील शूर, पराक्रमी, सहिष्णू, आदर्श शासनकर्ता राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते. महाराजांप्रमाणे त्यांचे मावळे शुर आणि पराक्रमी आहेत. स्वराज्याची स्थापना करून महाराजांनी रयतेला आणि मावळ्यांना अन्याय विरुद्ध लढण्याची शिकवण दिली. आजही असे अनेक लोक आहेत आहेत जो हा वारसा जपण्याचा प्रयत्न करत आहे. अशाच एका शिवकलीन युद्ध कला शिकवणाऱ्या प्रशिक्षिकाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एका विद्यार्थीला आत्मरक्षणाचा धडा शिकवताना एक शिक्षक दिसत आहे. लोकांना हा व्हिडीओ आवडला आहे.
काय आहे व्हायरल व्हिडीओ?
तलवार, दाणपठ्ठा, लाठी काठी या शिवकालीन युद्धकलेचा वारसा आपण जपला पाहिजे या हेतूने काही लोक प्रयत्न करत असतात. अशा एका शिवकालीन युद्धकला शिकवणाऱ्या शिक्षकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक प्रशिक्षक एका शाळेतील विदयार्थीनींना आत्मरक्षणाचे धडा देताना दिसत आहे. जर एखाद्या मुलीवर कोणी हल्ला केला तर मुलींनी स्वत:ला कसे वाचवले पाहिजे हे प्रशिक्षक समजावून सांगत आहे. त्यासाठी प्रात्यक्षिक दाखवताना एका विदयार्थीचे सहकार्य घेताना दिसत आहे. समजा कोणी मागून केस पकडले तर अशा परिस्थितीमध्ये मुलींनी काय करावे हे शिक्षकांनी दाखवले आहे. त्यासाठी त्यांनी विद्यार्थीला दोन नियम सांगितले आहेत.
हेही वाचा – चॉकलेट आइस्क्रीम कसे तयार केले जाते? पाहा फॅक्टरीमधील व्हिडिओ
कोणी हल्ला केला तर मुली कसे करू शकतात आपले संरक्षण?
व्हिडीओमध्ये प्रात्यक्षिक सादर करताना जर हल्लेखोराने विदयार्थीनीचे केस मागून घट्ट पकडून ठेवले तर पहिला नियम वापरायचा. पहिल्या नियमानुसार, हल्ला करणाऱ्याचा केसांना पकडलेला हात दोन्ही हातांनी पकडून ठेवा आणि जागच्या जागी एक गिरकी घ्या जेणेकरून हल्लेखोराच्या हाताला पिठ पडले त्यानंतर दुसरा नियम वापरायचा. दुसऱ्या नियमानुसार. सर्व ताकद एकवटून हल्लेखोराच्या पायावर (गुडघ्याच्या मागील बाजूल) जोरात लाथ मारा आणि हल्लेखोराला जमिनीवर पाडा. हात आणखी पिळला गेल्यामुळे हल्लेखोराची केसांवरील पकड सुटेल आणि तुमची सुटका होईल.
हेही वाचा – काजू, बदाम, पिस्ता वेलची वापरून बनवले दागिने; महिलेचा ‘ड्राय फ्रुट ज्वेलरी’चा व्हिडीओ व्हायरल
नेटकऱ्यांना आवडला व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. मुलींवर होणाऱ्या अत्यचारांची आकडेवारी पाहता प्रत्येक मुलींला आत्मरक्षणाचा धडे शिकवला पाहिजे जेणेकरून संकटाच्या वेळी स्वत:ची रक्षा करू शकतील. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले,” खूप छान, या काळात खूप गरज आहे मुलींना शिक्षण देण्याची सर.” दुसरा म्हणाला जबरदस्त! खरं तर एक गोष्ट खूप आवडली. पाय लावण्याआधी तिने नमस्कार केला.