सोशल मीडियावर दररोज मनोरंजक व्हिडीओ शेअर होत असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेची जोरदार चर्चा सुरूये. यात चोर त्याच्याच कारनाम्यात अडकलेला दिसून येत आहेत. आंध्र प्रदेशातून समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये एक चोर चोरी करण्यासाठी खिडकी तोडून मंदिरात घुसला होता. मंदिरातून चोरी केल्यानंतर चोरटे बाहेर पडत असताना मात्र खिडकीतच अडकून बसला. हे दृश्य पाहणं फारच मनोरंजक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेला चोरटा मंदिराच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पापा राव असे या तरुणाचे नाव असून त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. चोरीच्या उद्देशाने तो खिडकी तोडून मंदिरात घुसला, मात्र बाहेर येताना तो खिडकीतच अडकला. विचित्र स्थितीत अडकल्यानंतर तरुणाने गजर केला तेव्हा आजूबाजूचे लोक जमा झाले. मंदिराच्या खिडकीजवळ पोहोचल्यावर तो तरुण खिडकीतून अर्धा बाहेर पडल्याचे लोकांनी पाहिले. ही परिस्थिती पाहता स्थानिक लोकांनी तरुणाला बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले. दारूचे व्यसन पूर्ण करण्यासाठी तो चोऱ्या करत असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. मंदिरातील चोरीचे दागिने पोलिसांनी तरुणाकडून जप्त केले आहेत.

आणखी वाचा : पुन्हा परत येणार का डायनासोर? हा VIRAL VIDEO खरा की खोटा यावर चर्चेला उधाण

या व्हिडीओबाबत सोशल मीडियावर लोक अनेक प्रकारच्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. सूरज नावाच्या युजरने लिहिले की, देवाने जागेवरच निर्णय घेतला आहे. पवन सिंह यांनी लिहिले की, “अरे देवा, एक विचित्रच माणूस आहे हा…तो त्याच्याच जाळ्यात अडकला आहे.” दीपक जोगी लिहितात की, “जसे कर्म कराल देव तसेच फळ देतो.”

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ही दोस्ती तुटायची नाय…; पाहा माकड आणि पक्ष्यांची अनोखी मैत्री

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवरीला पाहून नवरदेवाला बसला जोर का झटका, समोर येऊन केलं असं काही…

देवही खूप महान आहे, अशी प्रतिक्रिया संदीप वर्मा यांनी दिली. देवेंद्र शुक्ला हसत हसत इमोजीसह लिहितात की, “अरे भाऊ, तुम्ही चांगला सरावे करायला हवा होता.” चोरीचे अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असले तरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.