खरा मित्र नेहमीच आपल्या पाठीशी उभा असतो. दु:ख असो वा सुख, प्रत्येक वेळी फक्त मित्रच कामी येतात. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मित्र त्याच्या मित्राला मदत करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मित्र फक्त माणसांसाठीच नसतात, तर प्राण्यांसाठीही असतात. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक कासव दिसत आहे, जो दगडावर चढण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा आकार लहान असल्यामुळे त्याला चढता येत नाही, तेवढ्यात दुसरे कासव येऊन मित्राला मदत करते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की काय झालं?

व्हायरल व्हिडीओमध्ये एक कासवा दुसऱ्या कासवाला कशी मदत करते हे दिसत आहे. सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. एका कासवाने पाण्यात पडलेल्या दगडावर चढण्याचा प्रयत्न केल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो, पण चढू शकत नाही.

(हे ही वाचा: एखाद्या खेळण्याप्रमाणे ही चिमुरडी खेळतीये सापाशी! आश्चर्यचकित करणारा Video Viral)

(हे ही वाचा: एका अपघातात मुलाने दोनदा मृत्यूला दिला चकवा! अंगावर काटा आणणारा Video Viral)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ फॉरेस्ट ऑफिसर सुशांत नंदा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे, ५७.८ हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. एका वापरकर्त्याने कमेंट केली की फक्त खरा मित्र नेहमीच काम करतो. दुसरीकडे, दुसर्‍या यूजरने कमेंट करताना लिहिले आहे – मित्र हे फक्त मित्र असतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The tortoise friend helped him to climb the rock beautiful video viral showing friendship ttg