स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर हा फावल्या वेळेत होतो. ऑफिसमध्ये जाताना आणि ऑफिस सुटल्यावर घरी येताना प्रवासात सर्वाधिक सर्चिंग केलं जातं. या दरम्यान सर्वाधिक पसंती ही व्हायरल व्हिडीओंना दिली जाते. काही व्हिडीओ आश्चर्याचा धक्का देणारे असतात, तर काही व्हिडीओमुळे हसू आवरत नाही. सध्या काही व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहेत. नेटकरी असे व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. असाच एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. यात एका लहान कासवाने तडफडत असलेल्या माशाची कशी मदत केली ते पाहू शकता.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तलावातील दगडावर एक मासा अडकल्याचे दिसत आहे. अर्धा भाग पाण्याबाहेर असल्याने निश्चितच खूप त्रास होत आहे. मासा अशा स्थितीत असताना एक कासव त्याच्या मदतीसाठी पुढे येतो. व्हिडीओ पाहून असे दिसते की, पाण्यातून बाहेर आल्यानंतर बेशुद्ध झालेल्या माशाला कासवाने चावा घेतला. त्याच्या या कृतीमुळे मासा शुद्धीवर येतो. शुद्धीवर आल्यानंतर मासा पुन्हा एकदा पाण्याच्या आत जाण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्याला यश मिळतं आणि त्याचा जीव वाचतो.
हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. या व्हिडीओखाली यूजर्स त्यांच्या प्रतिक्रिया कमेंट देताना दिसत आहेत. बहुतेक युजर्स कासवाचे कौतुक करताना दिसतात.