रेल्वे क्रॉसिंगवर अनेक धोकादायक अपघात घडतात. अनेक वेळा या अपघातांमध्ये लोकांचा वेदनादायक मृत्यू होतो. आपण विचार करू शकता की जर एखाद्या कारची आणि ट्रेनची टक्कर झाली तर ते काय होईल? अशा परिस्थितीत माणूस जगला तर तो ‘निसर्गाचा करिष्मा’ असेल. काही भाग्यवान लोक मृत्यूलाही टाळतात असचं म्हणावं लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिलेने मृत्यूला टाळले

अशीच एक घटना इंग्लंडमधून समोर आली आहे, जिथे एका महिलेने मृत्यूलाही चकवले. या प्रसंगात गाडीची अवस्था बघून तुम्ही विचार न करता म्हणाल की गाडीचा चालक कोणत्याही परिस्थितीत वाचला नसता. मात्र ही कार चालवणाऱ्या महिला चालकाला स्क्रॅचही आला नाही. ही घटना एसेक्समधील रेल्वे क्रॉसिंगवर घडली.

( हे ही वाचा: महिलेला जेवणात आढळला असा पदार्थ की… VIDEO पाहून तुम्ही चक्रावून जाल! )

नक्की काय झालं?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सँड्रा रेस्को नावाची महिला कार घेऊन जात होती. तेव्हा रेल्वे क्रॉसिंगपूर्वी तिचे गाडीवरील नियंत्रण सुटले. महिलेचे म्हणणे आहे की, तिथे इतका बर्फ होता की तिची कार घसरायला लागली. ती ब्रेक लावत होती, पण कार तिच्या नियंत्रणाबाहेर गेली होती.

( हे ही वाचा: दुसऱ्या लग्नासाठी मिरवणूक घेऊन नवरदेव पोहोचला मुलीच्या घरी, पहिली बायको समोर उभी दिसली, मग.. )

बर्फात घसरून गाडी रेल्वे रुळावर पोहोचली

महिलेने सांगितले की, रेल्वे क्रॉसिंगच्या आधी ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण घसरल्यामुळे तिची गाडी रेल्वे रुळावर आली. यानंतर त्यांची गाडी सरळ जाऊन रेल्वे रुळावर थांबली. महिलेने सांगितले की तिची गाडी रेल्वे रुळावर थांबताच तिला ट्रेन येताना दिसली. हे सर्व इतक्या लवकर घडले की तिला विचार करायलाही वेळ मिळाला नाही.

( हे ही वाचा: पाकिस्तानच्या ड्रायव्हरने दही खरेदीसाठी थांबवली ट्रेन, VIDEO झाला व्हायरल मग…)

यानंतर तिच्या अंगात शक्ती कुठून आली हे तिलाही समजलं नाही आणि ती पटकन करत गाडीतून बाहेर आली. ट्रेनने कारला जोरदार धडक दिली तेव्हा ती आधीच कारमधून बाहेर पडली होती. ही टक्कर इतकी भीषण होती की अर्धी कार उडून गेली आणि अर्धी कार रेल्वे रुळावरून बाहेर आली. या अपघातात कारचा संपूर्ण मागील भाग चक्काचूर झाला. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की जर एक सेकंदाचाही विलंब झाला असता तर सँड्राला आपला जीव गमवावा लागला असता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The train hit the car at the crossing but the female driver did not even get a scratch incident photos viral ttg