इंटरनेट हे ज्ञानाचे भांडार आहे. पण अनेक चुकीची माहितीही इथे सापडते. अनेकदा असे व्हिडीओ सापडतील जे तुम्हाला संमोहित करतील. असाच एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये समुद्राची मोठी लाट ढगांना स्पर्श करताना दिसत आहे. समुद्राची लाट ढगांना स्पर्श करू शकते का? हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल.
हा व्हिडीओ पहिल्यांदा पाहिल्यावर हेच वाटत असले तरी ते खरे नाही. ढगांना लाटा का स्पर्श करताना दिसतात त्यामागे विज्ञान आहे. ४० सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये असे दिसते की, लाट जेव्हा उंचीवर पोहोचते तेव्हा तिचा वरचा भाग ढगांना स्पर्श करू लागतो आणि तीथून खाली येतो. हा खूप जुना व्हिडीओ आहे जो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. तो आतापर्यंत १५ लाख लोकांनी पाहिला आहे.
(हे ही वाचा: मां तुझे सलाम! आपल्याला मुलाला वाचवण्यासाठी हत्तीणीने लढवली युक्ती; हा viral video जिंकेल तुमचं मन)
(हे ही वाचा: Viral Video: हवा भरतानाच जेसीबीचा टायरच फुटला अन्….; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद)
ढग नाहीत हे आहेत सागरी एरोसोल
हा व्हिडीओ खरा आहे, पण लाट ढगांना स्पर्श करत असल्याची माहिती चुकीची आहे. हे प्रत्यक्षात समुद्र स्प्रे एरोसोल (SSA) आहेत. एरोसोल ही एक प्रक्रिया आहे जेव्हा द्रव वायूमध्ये मिसळतो आणि वेगळे होतो. हे एक द्रव आहे, परंतु जेव्हा ते फवारले जाते तेव्हा ते वेगाने बाहेर येते आणि गॅसमध्ये मिसळते.
(हे ही वाचा: Video: चालकाने ऑटोरिक्षाच्या छतावरच बनवली बाग, गरमी पासून वाचवण्यासाठी केला देशी जुगाड)
ते ढगासारखे का दिसतात?
यूएस सरकारच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या वेबसाइटनुसार, स्प्रे एरोसोल (SAA) ढगांसारखे दिसतात आणि बहुतेक महासागरात तयार होतात. लाटेच्या अगदी वरच्या बाजूला, वाऱ्याने पाणी उडते, त्यामुळे ते हवेत मिसळते आणि उडू लागते, ज्यामुळे ते ढग असल्याचे दिसते. सायन्स डायरेक्टच्या मते, वातावरणातील रासायनिक प्रक्रिया आणि पृथ्वीचे रेडिएशन संतुलन तयार करण्यात स्प्रे एरोसोल महत्त्वाची भूमिका बजावतात. ढगाळ गुणधर्मांमुळे ते सौर विकिरण कमी करण्यास मदत करतात.