जगभरातील अनेक लोकांना चहा प्यायला आवडतो. आपल्या देशातील लोकांना चहाचं किती वेड आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. देशातील कानाकोपऱ्यात तुम्हाला अनेक चहाप्रेमी पाहायला मिळतील. ऑफिसच्या कामातून मूड फ्रेश करण्यासाठी अनेकजण चहा पितात. सोशल मीडियावर चहाशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातून लोकांना चहा किती प्रमाणात आवडतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पण, सध्या एका व्यक्तीने अशा अनोख्या पद्धतीने चहा बनवला आहे, जे पाहून अनेकांना हॉस्टेलमधील दिवसांची आठवण आली असेल यात शंका नाही.
खरं तर गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हटलं जातं. शिवाय अनेकदा आपल्याकडे चहाला वेळ नसली तरी वेळेवर चहा पाहिजे, असं म्हटलं जातं. असंच वेळेवर चहा पिण्यासाठी एका व्यक्तीने जुगाड केला आहे. चहाची वेळ झाली आणि गॅस शेगडी उपलब्ध नसल्यामुळे या व्यक्तीने असा जुगाड केला आहे जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल यात शंका नाही.
हेही पाहा- लाइव्ह मुलाखतीदरम्यान कॅमेऱ्यात कैद झाला भलामोठा अजगर, VIDEO पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा
लोकांना चहा प्यायला आवडतो, शिवाय थंडीच्या काळात चहा पिणं आवडीसह गरजदेखील बनते. त्यामुळे अनेकदा चहाप्रेमी हिवाळ्यात सतत चहा पितात. असाच एक चहाप्रेमी चहाची तलफ आली म्हणून पाणी गरम करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हिटरने चहा बनवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे. तर अनेकजण या जुगाडाचं कौतुक करत आहेत.
चहा बनवण्याच्या या अनोख्या जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर @asfandqaisrani नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. १८ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पाणी तापवण्याच्या हिटरने चहा बनवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये हिटरचा रॉड गरम झाल्यामुळे चहा उकळताना दिसत आहे. या अनोख्या जुगाडाचा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “चहाप्रेमींसाठी हॉस्टेल जुगाड.” तर व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिलं, “हे तंत्रज्ञान देशाबाहेर जाऊ देऊ नका.”