अनेक लोक पगारवाढीसाठी किंवा वातावरणात बदल करण्यासाठी नोकरी बदलतात. ते एका कंपनीमधून दुसऱ्या कंपनीमध्ये कामासाठी जातात. काही लोक त्यांच्या छोट्या करिअरमध्ये अनेक नोकऱ्या बदलतात. तर काही एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम करतात. नोकरी सोडताना किंवा कंपनी बदलताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे, ‘राजीनामा पत्र’ हे पत्र सांगते की तुमचे बॉसशी संबंध नंतर कसे राहू शकतात? ते तुम्हाला पुन्हा कामावर घेतील की नाही? त्यामुळे काही लोक त्यांच्या राजीनामा पत्रावर खूप मेहनत घेतात. सध्या सोशल मीडियावर असेच एक पत्र व्हायरल होत आहे, जे पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. हो कारण हे पत्र इतके क्रिएटीव्ह आहे की, ते शेअर करण्याचा मोह अनेक नेटकऱ्यांना आवरता येत नाहीये.
खरं तर अनेक लोक नोकरी सोडताना वेगवेगळ्या पद्धतीने ‘राजीनामा पत्र’ लिहित असतात. काही दिवसांपुर्वी एका कर्मचाऱ्याने ‘काम करताना मज्जा नाही येत’ असं लिहिलेलं पत्र आपल्या बॉसला दिलं होते, जे खुद्द हर्ष गोएंका यांनी शेअर करत केलं होतं. तर आता असंच एक पत्र व्हायरल होत आहे, जे खुद्द ‘Swiggy Instamart’ ने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केलं आहे.
२४ जुलै रोजी ‘Swiggy Instamart’ च्या ट्विटर हँडलवरून एकाराजीनामा पत्राचा फोटो शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे, “Instamart चा वापर करुन तुमची नोकरी कशी सोडायची.” हे ट्विट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या ट्विटला आतापर्यंत ९१ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि दोन हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
व्हायरल होत असलेलेराजीनामा पत्र खूप अनोखे आणि भन्नाट आहे. कारण या लेटरमध्ये काही शब्दांऐवजी प्रसिद्ध खाद्यपदार्थांचे पॅकेट वापरले गेले आहेत. उदाहरणार्थ, लिटल हार्ड लिहिण्याऐवजी ‘लिटिल हार्ट’ पॅकेट वापरण्यात आले आहे. तर ‘गूड डे’ च्या जागी बिस्किटचा पुडा चिटकवला आहे. तक काही कॅटबरीदेखील लावण्यात आल्या आहेत, बाकी या पत्रात काय काय लिहिलं आहे ते तुम्ही सविस्तर वाचू शकता. काही नेटकऱ्यांनी या व्यक्तीची क्रिएटीव्हीटी अप्रतिम आणि चौकटीच्या बाहेरची असल्याचं म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्याने शेवटची लाईन बेस्ट असल्याचं लिहिलं आहे.
तर अनेकांनी हे राजीनामा पत्र अप्रतिम असल्याचं म्हटलं आहे.