Viral Video: कार, बाईक असो किंवा एखादे अवजड वाहन; त्यांचा वेग हा वाहनचालकावर अवलंबून असतो. वेगावर नियंत्रण ठेवणे, योग्य संधी मिळताच ओव्हरटेक करणे. पण, ओव्हरटेक करताना तुमच्या मनात शर्यतीची किंवा स्टंट करण्याची भावना असू नये. कारण- वाहनचालकाच्या एखाद्या चुकीमुळे किंवा त्यांच्या बेजाबदारपणामुळे अनेक रस्ते अपघातदेखील होत असतात. तर आज याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही बाईकचालक रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना, रील्सच्या नादात ओव्हरटेक करताना दिसले आहेत.

सार्वजनिक रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्या अशा बाईकस्वारांमुळे ते इतर वाहनचालक, तसेच नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. अलीकडेच बिहारमध्ये बाईकवर धोकादायक स्टंट करणाऱ्या तरुणांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्याबद्दल सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्या व्हिडीओमध्ये इतर वाहनांचीही रस्त्यावरून ये-जा सुरू असल्याचे दिसत आहे. या गाड्यांच्या बाजूने बाईकस्वारांचा एक ग्रुप झिग-झॅग स्टाईलमध्ये बाइक चालविताना आणि ओव्हरटेक करताना दिसतोय. नक्की काय घडले ते व्हायरल झालेल्या व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…गाडीत एसी नव्हता म्हणून पट्ठ्याने शोधला उपाय; घरून आणला सिलिंग फॅन अन्… पाहा व्हायरल VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, चार दुचाकीस्वार रस्त्यावर विचित्र पद्धतीने बाईक चालविताना दिसत आहेत. जसजसा व्हिडीओ पुढे जातो, तशी एक रिक्षा विरुद्ध दिशेने येते आणि त्यात काही प्रवासीसुद्धा बसलेले असतात. या चार बाईकपैकी एक चालक प्रवाशांनी भरलेल्या अनेक रिक्षांना ओव्हरटेक करताना दिसतो; जे पाहून तुम्हालाही काही क्षणांसाठी भीती वाटेल. अशा कृत्यामुळे हे बाईकचालक केवळ स्वतःचाच नव्हे, तर इतरांचाही जीव धोक्यात घालताना दिसत आहेत हे स्पष्टपणे दिसून येत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ गेम्स ऑफ दिल्ली नावाच्या @Sachinr695 एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये ‘या मुलांना स्वतःच्या जीवाची पर्वा तर नाहीच आहे. पण, ते तर रस्त्यावरून चालणाऱ्या इतर लोकांचाही जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. कृपया या प्रकरणाची दखल घेऊन कठोर कारवाई करा’, असे सांगत एका बाईकचा नंबरदेखील कॅप्शनमध्ये लिहिलेला आहे. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. अनेकांनी त्यांच्या बेजबाबदार वर्तनाबद्दल टीकाही केली. बिहारच्या पोलिसांनीदेखील त्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली. तसेच व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरला अधिक माहिती शेअर करण्यास सांगितले; जेणेकरून पोलीस कारवाई करू शकतील