Sindhudurag viral video: भल्या सकाळी मधुर आवाजात ‘वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला’ असे म्हणत लोकगीतातून हरिनामाचा गजर करीत पारंपरिक लोकगीते गाणारे वासुदेव हल्ली गायबच झाले आहेत, मात्र अजूनही कोकणात हे दृश्य सणासुदीला पाहायला मिळत. अशातच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. कुडाळ जि.सिंधुदुर्ग येथे वासुदेव वेशात आलेल्या तिघांना काही गावकऱ्यांनी अमानुषपणे बेदम मारहाण केली आहे, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओवरुन उलटसुलट चर्चाही होत आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही संतापले आहेत.
वासुदेवाच्या वेशात आलेल्यांना बेदम मारहाण
“महाराष्ट्राची मराठी संस्कृती जपणाऱ्या,गरीब वासुदेवाची आशा प्रकारे अमानुषपणे बेदम मारहाण करणाऱ्या रिकामटेकड्या गावगुंडांचा जाहीर निषेध…”असं म्हणत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. अशाप्रकारे मारहाण करणे, कायदा हातात घेणे चुकीचं असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे तर, वासुदेवाच्या पोषाखात आलेले हे लोक भामटे असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तिघे जण वासुदेवाच्या पोषाखात दिसत आहेत, यावेळी गावकरी त्यांना घोळखा घालून उभे आहेत, काहीजण त्यांना शिवीगाळ करत आहेत, काहीजण त्यांच्या चक्क अंगावर धावून जात आहेत.
खरी बाजू कोणती?
त्यातील एक व्यक्ती त्यांना विचारत आहे, हॉस्पिटलमध्ये जाणार की? पोलिसात? यानंतर पुढच्याच क्षणी एक तरुण त्या तिंघापैकी एकाला मारायला सुरुवात करतो. तो व्यक्ती खाली कोसळतो तरीही तरुण त्यांना अमानुषपणे मारत आहे. मात्र आता याबाबत खरी बाजू कोणती हे अद्याप समोर आलेलं नाही.
व्हिडीओ शेवटपर्यंत बघा
हेही वाचा >> “पोरी कुठली गं तू?” खानदेशी आजीच्या फॉरेनच्या सुनेबरोबर मराठीत गप्पा, VIDEO पाहून म्हणाल वाहह क्या बात…
हा व्हिडीओ @ChandanSontakk8 अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी व्हिडीओची चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधीत परीसतातील पोलिस प्रशासनाने यांवर तातडीने कार्यवाही करावी, अशीही मागणी होत आहे. तसेच व्हिडीओचीही सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु आहे.