आज देशभरात ७७ व्या स्वातंत्र्यादिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी लोक देशभक्तीमध्ये बुडून जातात. जो तो आपापल्या पद्धतीने आपलं देशावर असणारं प्रेम व्यक्त करत असतो. खरं तर, देशभरात स्वातंत्र्यदिन हा एखाद्या सणासारखा साजरा केला जातो. आजच्या दिवशी भारतीय लष्कराचे शौर्य दाखवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भारतीय सैन्यासमोर पाकिस्तानी लष्कराची फजिती झाल्याचं पाहायला मिळत आहे.

भारतीय लष्करासमोर पाकिस्तानची फजिती –

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी लष्कराची भारतीय लष्करासमोर आपली इज्जत वाचवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये, बीटिंग रिट्रीटचा सोहळा सुरू असल्याचं दिसत आहे. ते पाहण्यासाठी हजारो लोक उपस्थित आहेत. यावेळी दोन्ही देशाचे सैन्य एकमेकांसमोर परेड करत असताना अचानक एका पाकिस्तानी जवानाचा तोल बिघडतो आणि तो खाली पडता पडता वाचतो.

हेही पाहा- दुकान नव्हे मन मोठं पाहिजे! तिरंगा खरदीवर चहा फ्री, DSP ने शेअर केलेल्या व्हिडीओतील आजोबांची देशभक्ती पाहून कराल सलाम

व्हिडिओत पुढे, तोल बिघडल्यामुळे पाकिस्तानी सैनिकाच्या डोक्यावरील टोपी डोक्यावरून खाली पडते आणि तो ती हाताळताना दिसत आहे. त्यामुळे निदान परेडच्या वेळी तरी चांगला परफॉर्मन्स करा, अशा अनेक मजेशीर कमेंट नेटकरी पाकिस्तानी लष्करावरती करत आहेत.

अटारी बॉर्डरवरील बीटिंग रिट्रीट सोहळा –

११ ऑक्टोबर १९४७ रोजी अटारी बॉर्डरवर पहिल्यांदा तिरंगा फडकवण्यात आला होता. मात्र १९५९ पासून अटारी बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट सोहळा आयोजित केला जातो. या सोहळ्यादरम्यान दोन्ही देशातील नागरित मोठ्या संख्येने सहभागी होतात. या कार्यक्रमाचा कालावधी ६० ते १२० मिनिटांपर्यंत असतो.

Story img Loader