आपण अनेक अशा मुलांना पाहिलं आहे जी वर्षभर अभ्यास करत नाहीत. शाळेत काय शिकवतात त्याकडे दुर्लक्ष करतात आणि ऐन परीक्षेच्या काळात स्वत:ची फजिती करुन घेतात. सध्या अशाच एका मुलाने लिहलेल्या पेपरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो पाहिल्यावर तुम्हाला हसू आवरणार नाही.

शाळेत दोन प्रकारची मुलं असतात एक जे वर्षभर मनापासून अभ्यास करतात तर दुसरे अभ्यास सोडून बाकीचे सगळे उद्योग करत असतात. त्यामुळे साहजिकच वर्षभर अभ्यास करणारे विद्यार्थी परीक्षेच्या काळात चांगला पेपर लिहून चांगले गुण मिळवतात. मात्र, अभ्यास न केलेल्या विद्यार्थ्यांना पेपर पाहून त्यामध्ये लिहायचं काय? असा प्रश्न पडतो. त्यामुळे मग ते परीक्षेत पास होण्यासाठी कॉपी करतात. तर कधी पेपरमध्ये काहीही थापा लिहितात.

Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Trending video boy from village singing song of nathicha nakhara goosebumps came on people after listing his song viral video
“नथीचा नखरा नऊवारी साडी” शाळकरी मुलाच्या गाण्यानं अख्ख्या महाराष्ट्राला लावलं वेड; सूर असा की अंगावर येतील शहारे, VIDEO पाहाच
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
pune fc road video : a puneri boy amazing suggestion to youngsters
Video : “मित्रा, यावर्षी तरी तिच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी …” पुणेकर तरुणाने दिला लाखमोलाचा संदेश, पुणेरी पाटी होतेय व्हायरल

हेही पाहा- Video: डोक्यावर चार गोळ्या लागूनही कुत्रीचा जीव वाचला, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका विद्यार्थ्याने फिजिक्सच्या पेपरमध्ये उत्तराऐवजी चक्क गाणी लिहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्हायरल होत असलेला उत्तरपत्रिकेचा व्हिडिओ पाकिस्तानातील कराची येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

हा व्हिडिओ पाकिस्तानी गायक अली जफरने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये शिक्षक विद्यार्थ्याने लिहिलेला फिजिक्सचा पेपर दाखवताना दिसत आहेच. ज्यामध्ये ते सांगत आहेत की, कराची बोर्डाच्या एका विद्यार्थ्याने पेपरमध्ये उत्तराऐवजी गाणी लिहिली आहेत. शिवाय ते या व्हिडीओमध्ये सर्व पेपर उलघडून दाखवत आहेत. विद्यार्थी पेपर तपासणाऱ्यांना आंधळा समजतो असंही शिक्षक व्हिडीओत म्हणत आहेत.

हेही पाहा- रिक्षाचालकाने चक्क दोन चाकांवरच पळवली रिक्षा, घटनेचा थरारक Video होतोय व्हायरल

व्हिडीओत, पेपरमध्ये विद्यार्थ्याने लिहिलं आहे की, ‘शपथ की मी खूप धोकादायक पेपर दिला आहे’. शिवाय त्याने पुढे उत्तराच्या जागी अली जफरचं गाणी पेपरमध्ये लिहिली आहेत. हे पाहून खुद्द अली जफरही आश्चर्यचकित झाला आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलं आहे की, विद्यार्थ्यांनी गाण्यांवर जास्त लक्ष देण्याऐवजी अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे.’

नेटकऱ्यांना आवडला व्हिडीओ –

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांना तो आवडला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ६८ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने अली जफरला, ‘आता तुच, न्यूटनचे तीन नियम, भौतिकशास्त्राच्या नियमांची गाणी बनव आणि ती गायची जबाबदारी घे’ असं म्हटलं आहे.

Story img Loader