Video Ten year old boy sings traffic awareness self-composed songs : गाडी चालविताना वाहतुकीचे नियम माहीत असणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे असते. पण, आपल्यातील अनेक जण बेपर्वाईने वाहन चालवून वाहतुकीच्या नियमांचे मुद्दाम उल्लंघन करतात. मग वाहतूक पोलिसांनाही अशा बेफिकीर व्यक्तींकडून दंड वसूल करावा लागतो. पण, आज सोशल मीडियावर एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले आहे. आज एका १० वर्षांच्या चिमुकल्याने ट्रॅफिक नियमांबद्दलची जागरूकता वाढविण्यासाठी स्वतः तयार केलेले गाणे सादर करून दाखवले आहे.

व्हायरल व्हिडीओ (Video) मध्य प्रदेशातील इंदूरचा आहे. १० वर्षांच्या आदित्य तिवारी याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रॅफिकदरम्यान प्रवाशांचे मार्गदर्शन करण्यासाठी तो स्वतः तिथे उपस्थित राहिला आहे. तो ट्रॅफिक पोलिसांप्रमाणे हुबेहूब गणवेश परिधान करून, माईक लावून, ट्रॅफिक सिग्नलवर प्रवाशांना सावध करताना दिसत आहे. ज्यांनी हेल्मेट घातले आहे आणि ज्यांनी सीट-बेल्ट लावला आहे त्यांना हा चिमुकला चॉकलेट व पेपर स्मायली कट-आउटसुद्धा देताना दिसत आहे. सहा मिनिटांचा हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीसुद्धा बघा…

cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
indian railway viral video
ट्रेनमधून प्रवास करताना ‘ही’ एक चुक पडू शकते महागात, होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान; पाहा धक्कादायक घटनेचा VIDEO 
digital arrest video real cop catches scammer cop video viral
स्कॅमरचा झाला गेम! नकली पोलीस बनून खऱ्या पोलीस अधिकाऱ्याला केला व्हिडीओ कॉल अन्… VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
Puneri kaka dance video uncle aunty dance video goes viral on social media
VIDEO: पुणेकर काकांचा नाद नाय! चंद्रा गाण्यावर केला खतरनाक डान्स; नेटकरी म्हणतात “आयुष्य असं जगता आलं पाहिजे”
Little Boy Viral Video
“तू मोठा झाल्यावर किती बायका करणार?” चिमुकल्यानं दिलं भन्नाट उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल; VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा…Raksha Bandhan 2024: पोलिसांकडून बहिणींना रक्षाबंधनाची खास भेट! ‘या’ शहरात आज महिलांची ‘ट्रॅफिक’ दंडापासून सुटका; पण नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

व्हिडीओ नक्की बघा…

मूर्ती लहान; पण कीर्ती महान!

व्हायरल व्हिडीओत ( Video) तुम्ही पाहिलं असेल की, १० वर्षांच्या चिमुकल्याने प्रवाशांना वाहतुकीचे नियम समजावून सांगण्यासाठी स्वतः गाणे बनवले आहे. हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वारांना तो चॉकलेटचे वाटप करतो आहे. तो, “धन्यवाद सर, आपने हेल्मेट पेहना है” (“हेल्मेट घातल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद”), असे एका माणसाला म्हणतो. तो त्या माणसाला पेपर स्मायली कट-आउटही देतो. इंदूरचे ड्युटीवर असणारे ट्रॅफिक पोलीस आणि काही प्रवासीसुद्धा या मुलाचे टाळ्यांच्या गजरात कौतुक करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ (Video) ANI च्या अधिकृत @ANI या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ANI शी बोलताना आदित्य तिवारीने सांगितले की, तो तीन वर्षांपासून वाहतूक नियमांबाबत त्याने बनवलेली गाणी गाऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करीत आहे. जसे इंदूर स्वच्छतेमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तसेच इंदूर वाहतूक नियमांचे पालन करण्यातही पहिल्या क्रमांकावर असायले हवे’, असे त्याने म्हटले आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा या चिमुकल्याचे कौतुक करताना दिसत आहेत.