Viral video: आयुष्यात एकदातरी दारू पिऊन बघावी, सिगारेट ओढून बघावी, असं अनेकजणांना वाटतं. परंतु ही एकवेळची हौस कधी व्यसनात बदलते हे कळतसुद्धा नाही. मग मात्र व्यसन सोडण्यासाठी मोठा खटाटोप करावा लागतो. त्यानंतरही कितपत दारू, सिगारेट सुटेल काही सांगता येत नाही. दारूचं व्यसन सोडवण्यासाठी बरेच उपाय केले जातात. पण काही केल्या दारूचं व्यसन सुटता सुटत नाही. दारूमुळे वाढती गुन्हेगारी आणि कुटुंबातील तणाव अनेक ठिकाणी तणावाचे प्रसंग निर्माण होत आहेत. महिलांच्या म्हणण्यानुसार, घरातील पुरुष मंडळी व्यसनाच्या आहारी गेल्याने कुटुंबातील महिलांना एकाकीपणाचा सामना करावा लागत आहे. अशातच एका बायकोनं आपल्या दारुड्या नवऱ्याच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून असं काही केलं की व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धराल.
गेल्या काही दिवसात पती पत्नीच्या वादाच्या अनेक घटना समोर येत आहेत. विविध कारणातून दोघांमध्ये वाद होऊन या वादाचे रुपांतर अनेकदा धक्कादायक घटनांमध्ये झाल्याचेही समोर आले आहे. सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे त्यामध्ये एका महिलेने आपल्या नवऱ्याच्या सगळ्या ब्रँडेड दारुच्या बाटल्या एका मागो-माग जमीनीवर टाकत फोडल्या आहेत.ज्यांच्या घरातील सदस्य दररोज दारू पितात, ज्यांना दारूमुळे त्रास होतो, ज्यांचा संसार दारूमुळे उद्ध्वस्त झाला आहे किंवा होतो आहे. अशाच त्रासाला कंटाळून या महिलेनं शेवटचा उपाय म्हणून सगळ्या बाटल्याच रिकाम्या केल्याचं दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही महिला घरातच स्टूलवर चढून कपाटात ठेवलेल्या सगळ्या दारुच्या काचेच्या बाटल्या घरातच वरुन टाकत आहे. काचेच्या असल्यामुळे त्या बाटल्या खाली जमीनीवर पडून फुटल्या आहेत आणि त्यात असलेली सगळी दारु जमीनीवर पडलेली दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ iamurswathinaidu नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी तुटून पडले असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया दिली आहे की, “बिचारा नवरा एवढी महागडी दारुची ही अवस्था केली” तर दुसऱ्यानं “तुम्ही आता रागाने फेकून देत असाल पण शेवटी तुम्हालाच ते साफ करावे लागेल.” तर आणखी एकानं “आता नवरा जेव्हा हे बघेल तेव्हा काय होईल याचा विचार करा…”