सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. मात्र, या व्हायरल होणाऱ्या वेगवेगळ्या व्हिडीओमुळे आपलं मनोरंजन होतं यात शंका नाही. अनेक नेटकरी सोशल मीडियावर असे काही भन्नाट आणि मजेशीर व्हिडीओ पोस्ट करतात, जे पाहिल्यानंतर आपणाला हसू आवरणं कठीण होतं. तर काही व्हिडीओ असे असतात जे पुन्हा पुन्हा पाहावे वाटतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरुन हसाल यात शंका नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवरा बायकोमध्ये सतत किरकोळ कारणावरुन भांडणं होत असतात. शिवाय त्यांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही होत असतात. सध्या अशाच एका जोडप्याच्या व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना हसू आवरणं कठीण झालं आहे. खरं तर कोणत्याही स्त्रिला आपला नवऱ्याने इतर स्त्रीयांकडे पाहिलेलं आवडत नाही. शिवाय असं करताना एखादा नवरा जर त्याच्या बायकोला सापडला तर काय होईल हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तर एका स्त्रिला तिचा नवरा चक्क एका मुलीबरोबर नाचतना सापडला आहे. मग त्या नवऱ्याचे जे काही हाल झाले आहेत ते तुम्हीही व्हिडीओत पाहा.

हेही पाहा- Video: “वय केवळ आकडा…” सायकलच्या सीटवर नव्हे तर चक्क हँडलवर बसून आजोबांनी केला भन्नाट स्टंट

नवऱ्याने परस्त्रीशी डान्स करायला सुरुवात केली अन्…

हेही पाहा- Video viral: बर्फात नऊवारी नेसून महिलेचा अनोखा स्टंट; नेटकरीही झाले चकित

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी एका हॉट मुलीबरोबर डान्स करताना दिसत आहे. काही वेळाने या व्यक्तीची पत्नी त्याला मुलीबरोबर अशाप्रकारे नाचताना पाहताच तीला धक्का बसतो. शिवाय ती यावळी एवढी रागावते की क्षणात नाचणाऱ्या नवऱ्याजवळ येते आणि त्याला मारायला सुरुवात करते आणि नवऱ्याला त्या गर्दीतून बाजूला घेऊन जाते.

नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया –

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत २ लाख ५९ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, तो व्यक्ती जिवंत आहे का? तर आणखी एकाने आता त्याला बायकोच्या तावडीतून वाचवणं कठीण असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The wife saw the husband dancing with another woman the funny video went viral jap
Show comments