Viral Video: सोशल मीडियामुळे आपल्याला अनेकदा आपण कधीही न पाहिलेल्या गोष्टींबद्दल माहिती मिळते. आपण सर्वांनीच आपल्या लहानपणी अनेक परीकथांमध्ये सोन्याचा हंडा, गुप्तधन अशा विविध काल्पनिक कथा वाचल्या असतील. पण, अशा गोष्टी खऱ्या आयुष्यात होत असतील, यावर फार कमी लोकांचा विश्वास बसेल. पण, नुकत्याच समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये ही घटना खरोखर झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत असून यावर नेटकरी अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.
हल्ली अशा प्रकारचे विविध व्हिडीओ पुरातत्व विभागाच्या व्यक्तींमुळे पाहायला मिळतात, ज्यात कधी त्यांना एखाद्या जंगलात तर कधी एखाद्या भुयारामध्ये जुन्या वस्तू आणि दागिनेही सापडतात. आता समोर आलेल्या व्हिडीमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.
नक्की काय दिसलं व्हिडीओमध्ये?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या व्हिडीओतील महिला एका नदीच्या किनाऱ्यावर काहीतरी खोदताना दिसत आहे. यावेळी ती तिथे मेटल डिटेक्टर बीप वाजवण्यास सुरुवात करते, जे जमिनीखाली काही धातू असल्याचे संकेत देते. बराच वेळ जमीन खोदल्यानंतर तिला अचानक तिथे एक लाकडी पेटी सापडते. पेटी बाहेर काढून ती पाण्याने स्वच्छ करते आणि बाजूला जाऊन ती उघडते. यावेळी या पेटीमध्ये काही नोटा आणि नाणी दिसतात. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलंय की, “मला खजिना सापडला आणि जो नदीच्या किनाऱ्यावर काही गुंडांनी लपवला होता.”
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @_.archaeologist या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि २० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच त्यावर अनेक जण कमेंट्स करतानाही दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने लिहिलंय की, “व्वा… सध्याच्या १०० डॉलरच्या बिलांसह खजिना”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “मला वाटतंय हे खोटं आहे”, तर आणखी एकानं लिहिलंय, “तुम्ही खूप लकी आहात, तुम्हाला खजिना मिळाला”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “हे खोटं आहे.”
दरम्यान, यापूर्वीदेखील सोशल मीडियावर अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यात एका व्यक्तीला सोन्याच्या दागिन्यांनी भरलेला हंडा सापडला होता. यावरदेखील अनेक युजर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या.