ब्रेसलेटची किंमत ऐकताच चीनमधल्या एका महिलेला एवढा जबदस्त धक्का बसला की बेशुद्ध होऊन तिथेच कोसळली अन् तिला रुग्णालयात भरती करण्याची वेळ दुकानदारावर आली. ही महिला दागिने विकत घेण्यासाठी आली होती. तिला दुकानातलं ब्रेसलेट खूपच आवडलं, तिने ते हौसेने घालूनही पाहिलं पण हातातून काढताना तिच्या हातून ते खाली पडलं आणि नाजूक पण अत्यंत महागडं असं ब्रेसलेट तुटलं.
या दुकानात ग्राहकांच्या हातून एखादी वस्तू तुटली तर त्या वस्तूंची पूर्ण किंमत ग्राहकाला चुकवावी लागते असा नियम आहे. जेव्हा महिलेने याची किंमत ऐकली तेव्हा तिला तिथेच पॅनिक अॅटक आले आणि थोड्यावेळातच ती दुकानात कोसळली. या ब्रेसलेटची किंमत ४४ हजार डॉलर म्हणजे जवळपास २८ लाख होती. एवढी मोठी किंमत चुकवावी लागणार हे ऐकताच ती घाबरली आणि खाली कोसळली. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.
Viral Video : शाळेत मोबाईल आणणाऱ्या मुलांना अशी घडवली जाते अद्दल
ही महिला शुद्धीवर आल्यानंतर मात्र तिला नियमाप्रमाणे मौल्यवान वस्तूची किंमत चुकवण्यास दुकानदाराकडून सांगण्यात आलं पण एवढी मोठी किंमत चुकवणं शक्य नसल्यानं अर्धी किंमत तिच्याकडून वसूल करण्याचा निर्णय दुकानदाराने घेतला.