आपल्यापैकी अनेकजण दुकानात शॉपिंग करण्याऐवजी ऑनलाईन शॉपिंग करण्याला प्राधान्य देतात. त्याचं कारण म्हणजे Amazon, Flipkart या सारख्या इतर अनेक ईकॉमर्स कंपन्या ग्राहकांना दुकानांच्या तुलनेत अनेक आकर्षक सवलती देत असतात. त्यामुळे साहजिकच ग्राहकांचा कल ऑनलाईन कंपन्यांमधून शॉपिंग करण्याकडे असतो. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शॉपिंग करणं जेवढं फायद्याचं आहे, तेवढंच धोक्याचंही आहे. कारण, अनेक लोकांची ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली फसवणूक झाल्याच्या बातम्या आपण वाचत असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर कधी या कंपनीच्या चुकीमुळे आपण ऑर्डर केलेल्या वस्तूऐवजी वेगळीच काहीतरी ऑर्डर आपल्याला मिळाल्याच्या घटनाही घडत असतात. तर कधी आपली ऑर्डर वेळेत येत नाही. सध्या अशीच एक घटना उघडकीस आली आहे, ज्यामध्ये एका महिलेने ऑर्डर केलेला मोबाईल तिला मिळालाच नाही. मात्र, याचा फायदा महिलेलाच झाला असून कंपनीला निष्काळजीपणाचा चांगलाच भुर्दंड सोसावा लागला आहे.

हेही पाहा- Video: ऑर्डर घेऊन आलेल्या Zomato बॉयला मिळालं भन्नाट सरप्राईज; तरुणांच्या कृतीचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

आजतकने दिलेल्या बातमीनुसार, बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका महिलेने फ्लिपकार्टवरून १२,४९९ रुपयांचा मोबाईल ऑर्डर केला होता. मात्र, तिला मोबाईलची डिलिव्हरी मिळाली नाही. याबाबत तिने कंपनीशी अनेकवेळा संपर्क साधला पण कंपनीकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय ऑर्डर केलेला मोबाईलही मिळाला नाही. त्यामुळे कंपनीशी संपर्क करुन कंटाळलेल्या महिलेने अखेर फ्लिपकार्टविरोधात तक्रार दाखल केली.

हेही वाचा- Swiggy च्या कंडोम डिलिव्हरीच्या ट्वीटला ड्युरेक्स इंडियाने दिला भन्नाट रिप्लाय, नेटकरी म्हणाला, “१४ फेब्रुवारीला मोठी लाट…”

या महिलेच्या तक्रारीची दखल ग्राहक न्यायालयाने घेतली आणि न्यायलयाने महिलेच्या बाजूने निकाल दिला, त्यामध्ये न्यायलयाने सांगितलं की, फ्लिपकार्टने १२,४९९ रुपयांची मोबाईल किंमत महिलेला परत करावीच, याशिवाय महिलेने मोबाईलसाठी भरलेल्या रकमेवर १२ टक्के वार्षिक व्याजही कंपनीने द्यावे. एवढंच नव्हे तर कोर्टाने कंपनीला दंड म्हणून महिलेला २० हजार रुपये आणि कायदेशीर खर्चासाठी १० हजार रुपये द्यायचा आदेशही दिला. त्यामुळे महिलेला ४२ हजार रुपये प्लिपकार्टकडून मिळाले आहेत. त्यामुळे कंपनीचा हालगर्जीपणा त्यांच्याच अंगलट आल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा- ‘काळ्या जादू’द्वारे प्रेम मिळवून देतो सांगत अविवाहितांची लाखो रुपयांची फसवणूक; प्रेमासंबंधित मंत्रांचेही ठरलेले दर

कंपनीकडून निष्काळजीपणा – कोर्ट

फ्लिपकार्टने सेवेच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवला असून अनैतिक पद्धतींचे पालन केले आहे, असे बंगळुरू ग्राहक न्यायालयाने म्हटले आहे. शिवाय वेळेवर ऑर्डर न दिल्याने ग्राहकासा आर्थिक नुकसान आणि मानसिक आघात सहन करावा लागला असल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे. तसंच ही महिला फोन डिलिव्हरी झाला नसला तरीही मोबाईलचे हप्ते देत होती. कस्टमर केअरशी संपर्क साधूनही तिला योग्य ती माहिती मिळाली नाही असंही न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान, ऑनलाईन कंपन्यांकडून असले प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे ऑनलाइन खरेदी करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.