Woman married pet cat: आपण प्राण्यांवरील प्रेमाच्या संदर्भातील अनेक कथा आजवर पाहिल्या आणि वाचल्या असतील, पण सध्या व्हायरल होणारे प्रकरण जरा वेगळे आहे. एका महिलेचे आपल्या मांजरीवर इतके प्रेम होते की तिने आपल्या मांजरीशी लग्नच केले. या महिलेच्या घरमालकाला प्राण्यांचा तिरस्कार होता आणि त्यामुळे त्या महिलेला तिची तीन पाळीव प्राणी याआधीही इतर ठिकाणी हलवावी लागली होती.
‘डेली स्टार’च्या बातमीनुसार, या ४९ वर्षीय महिलेचे नाव डेबोरा हॉज आहे, तिने मंगळवारी आपल्या पाळीव मांजरीला जीवनसाथी बनवले. मोगी असे या ५ वर्षांच्या मांजरीचे नाव असून, ही मांजर दक्षिण-पूर्व लंडनमधील एका उद्यानात या महिलेला आढळून आली.
सिडकपच्या या महिलेने या लग्न समारंभात एक स्मार्ट टक्सिडो परिधान केला होता तर मोगीने या विशेष दिवशी बो टाय आणि कॅप घातली होती. या विवाह सोहळ्यात प्राणीप्रेमीने कायदेशीररित्या पास्टरची भूमिका बजावली आणि लग्नाचे विधी पूर्ण केले.
Viral Video : मुलीच्या केसांमध्ये अडकलं सापाचं पिल्लू; पुढे जे झालं ते बघून तुम्हालाही बसेल धक्का
दोन पायलट्सनी हवेतच केली विमानांची अदलाबदल अन्; घटनेचा Video Viral
डेबोरा म्हणाली की माझ्याकडे गमावण्यासारखे काही नव्हते आणि मिळवण्यासाठी सर्व काही होते, म्हणून मी माझ्या मांजरीशी लग्न केले. तिने सांगितले की माझे हेतू आधीच ठरलेले होते आणि मला माझ्या मांजरीपासून वेगळे व्हायचे नाही कारण मी तिच्यावर खूप प्रेम करते. ती महिला म्हणाली, ‘मी मोगीशिवाय राहू शकत नाही, ती खरोखरच खूप मैत्रीपूर्ण आणि अद्भुत आहे.’
महिलेने सांगितले की, ही मांजर तिच्या मुलांनंतर आयुष्यात सर्वात महत्त्वाची आहे. महिलेच्या लग्न समारंभाला तिच्या काही खास मित्रांनी हजेरी लावली होती पण डेबोरा मांजरीशी लग्न करत असल्यामुळे तिला वेड लागले आहे असे त्यांना वाटत होते.
डेबोराहने दावा केला आहे की तिच्या घरमालकाने मागील मालमत्तेवरील तिच्या दोन पाळीव प्राण्यांना बाहेर काढण्याची धमकी दिली होती. यानंतर महिला नवीन घरात शिफ्ट झाली पण इथेही तिला तिची पाळीव मांजर जमालला सोडायला भाग पाडण्यात आले. यानंतर तिने जो निर्णय घेतला, तो थक्क करणारा आहे.
डोबोराला तिच्या सध्याच्या घरमालकाकडून आणखी एक मांजर पाळण्याची परवानगी मिळाली. यानंतर, मोगी २०१७ मध्ये तिच्या आणि तिच्या दोन मुलांच्या कुटुंबाचा एक भाग बनली. आता लग्नानंतर या नवविवाहित जोडप्याला कोणीही वेगळे करू शकणार नाही, अशी आशा महिलेला आहे.