अमेरिकेतील एका महिलेने जवळपास ३७,००० फूट उंचीवर असणाऱ्या विमानाचा दरवाचा उघडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तिला अटक देखील करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आपणाला जीजसने हा दरवाचा उघडायला सांगितल्याचा दावा या महिलेने केला.
दरम्यान, दरवाचा उघडण्याच्या या महिलेच्या हट्टापायी या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आहे. अमेरिकतील एका कोर्टाने जाहीर केलेल्या अहवालानुसार, ३४ वर्षीय एलोम एग्बेग्निनूने सांगितले की “येशूने मला विमानाचा दरवाजा उघडण्यास सांगितलं” ही घटना शनिवारी ह्यूस्टन, टेक्सास येथून कोलंबस, ओहीयो येथे जाणाऱ्या साउथवेस्टच्या एअरलाइन्सच्या १९२ विमानामध्ये घडली आहे.
हेही पाहा- आळशीपणाचा कळस! Online Payment साठी सतत मोबाईल काढावा लागतो म्हणून पठ्ठ्याने हातावरच काढला बारकोड
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला विमानातून प्रवास करत असताना अचानक जागेवरून उठली आणि विमानाच्या दारापाशी जाऊन ते दार उघडण्याचा प्रयत्न करू लागली. इतर प्रवाशांनी तिला असं करण्यापासून रोखलं असता ती जोरजोरात दारावर डोकं आपटून घ्यायला लागली, शिवाय हे दार उघडण्यासाठी आपणाला जीजसने सांगितल्याचा दावा तीने केला.
महिलेचे हे कृत्य पाहून विमानातील इतर प्रवासी चांगलेच घाबरले होते. शिवाय विमानाचा दरवाचा महिलेने उघडल्यास विमान दुर्घटना घडेल असंही प्रवाशांना वाटलं. त्यामुळे काही प्रवाशांनी या महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तिने एका प्रवाशाच्या मांडीला चावा घेतला. तरीदेखील विमानातील प्रवाशांनी या महिलेला दरवाचा उघडू दिला नाही.
तर महिलेने विमानात घातलेल्या या गोंधळामुळे विमानाचे अर्कान्सासमधील बिल-हिलरी क्लिंटन राष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. यानंतर क्रू मेंबर्सनी महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, अमेरिकेतील जिल्हा न्यायालयाकडून जारी करण्यात आलेल्या कागदपत्रात म्हटलं आहे की, ‘एक वेडी महिला उड्डाणादरम्यान विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होती, दरवाचा उघडत असताना ती वारंवार सांगत होती की, ‘येशूने’ तिला तसे करण्यास सांगितले आहे.
हेही पाहा- देशी जुगाड! मुलाने बनवली भन्नाट गाडी, केवळ १० रुपयांमध्ये पार करणार १५० किलोमीटरचं अंतर
महिलेचे स्पष्टीकरण –
या संपूर्ण प्रकरणावर महिलेने स्पष्टीकरणं दिलं आहे. ती म्हणाली, “मी खूप दिवसांपासून प्रवास केला नव्हता, शिवाय मी खूप काळजीत होते, मी माझ्या नवऱ्याला न सांगता मेरीलँडमधील माझ्या एका कौटुंबिक मित्राला भेटण्यासाठी निघाले होते. यावेळी कसलंही सामान सोबत घेतलं नव्हत. मी कोणत्ययाही बॅगशिवाय घर सोडलं, अशा गोष्टी मी कधीही करत नाही.” महिलेने हे स्पष्टीकरण दिलं असलं तरी विमानामध्ये गैरवर्तन आणि प्रवाशांवर केल्याप्रकरणी या महिलेवर कारवाई होण्याची शक्यता आहे.