Viral Video : गणेशोत्सव हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता सण आहे. प्रत्येकजण दरवर्षी आतुरतेने गणपती बाप्पाची वाट पाहत असतात. गणपती बाप्पााविषयी लोकांच्या मनात असलेले प्रेम अनेकदा त्यांच्या कृतीतून दिसून येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेव्हा गणपती बाप्पााला निरोप द्यायची वेळ येते तेव्हा अनेकांचे डोळे पाणावतात तर काही लोकांचे डोळे मात्र बाप्पााच्या आगमनाने पाणावतात. प्रत्येकाचे बाप्पााबरोबर एक वेगळे कनेक्शन आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना बाप्पा हा आपला वाटतो. त्याच्या येण्याने प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हसू आणि डोळ्यांत आनंदाश्रू येते.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला गणपतीची मुर्ती पाहून भावूक होते. या महिलेच्या डोळ्यातील पाणी पाहून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : ‘स्वतःच्या जीवाशी खेळ…’ सुमद्राच्या पाण्यात मजामस्ती करणं आलं अंगलट; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “यमदेव तुम्हाला…”

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला गणपती बाप्पाची भव्य मूर्ती दिसेल. या मूर्तीसमोर हजारो भाविक उभे आहेत. अनेक जण बाप्पाचा फोटो काढत आहे तर काही लोक बाप्पााबरोबर सेल्फी काढत आहे. कोणी मनोभावे हात जोडून नमस्कार करत आहे तर कोणी एकटक बाप्पााकडे बघत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक महिला दिसेल. ती बाप्पााच्या मूर्तीकडे बघत हात जोडून उभी आहेत. बाप्पााला बघून तिचे डोळे भरून आले आहे. या महिलेचे पाणावलेले डोळे पाहून कदाचित तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

sai_1313 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बाप्पासमोर डोळ्यातून पाणी येणे, या अनेक गोष्टी सांगतात.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एका क्षणात Generation Gap दिसून येते , सुख मोबाईल मध्ये नव्हे तर डोळ्यात साठवायचे असते ” तर एका युजरने लिहिलेय, “बाप्पा समोर निघालेले अश्रु केव्हाच वाया जात नाही तो सगळं ठिक करतो त्याला असंच सुखकर्ता नाही म्हणत, बोला गणपती बाप्पा मोरया”

हेही वाचा : नदीकिनारी सेल्फी काढत होते पर्यटक, अचानक मोठी लाट आली अन् क्षणार्धात वाहून गेले सारे…, पाहा धडकी भरवणारा VIDEO

आणखी एका युजरने लिहिलेय, “मला आशा आहे की ती ज्या परिस्थितीचा सामना करत आहे त्यातून ती बरी होईल .बाप्पा सर्वांचे चांगले कर” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्स व्हिडीओ पाहून भावुक झाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The woman was staring at the ganesha idol and suddenly her eyes filled up with tears emotional video goes viral ndj