पृथ्वीवर विविध प्रकारचे प्राणी आढळतात, यातील काही गोंडस असतात तर काही धोकादायक असतात. अनेक धोकादायक प्राण्यांमध्ये सापाचा समावेश प्रामुख्याने होतो. अनेक लोक सापाला पाहताच घाबरतात. मात्र काही लोक असेही असतात जे सापांना न घाबरत त्यांना हुशारीने पकडतात. अशा अनेक सर्प मित्रांचे व्हिडीओ आपण पाहात असतो, ज्यामध्ये ते सापांना अगदी सहजपणे पकडतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिलेने घरातील छतावर अडकलेल्या दोन भल्यामोठ्या सापांना बाहेर काढल्याचं दिसत आहे.
महिलेच्या धाडसाचं नेटकऱ्यांकडून कौतुक –
व्हायरल व्हिडिओमध्ये, एक महिला टेबलावर उभी आहे आणि तिच्या हातातील काठी ती घरातील छतामध्ये बनवलेल्या बॉक्समध्ये घालताना दिसत आहे. यावेळी ती अतिशय हुशारीने तिथे बसलेल्या सापाला एका हाताने पकडते. याचवेळी तिथे असलेला आणखी एक साप अचानक बाहेर येतो. यावेळी ती महिला त्या दुसऱ्या भल्यामोठ्या सापालाही आपल्या हाताने धरून बाहेर ओढताना दिसत आहे. ती महिला अगदी सहजपणे सापांना हाताळत असली तरी ते पाहून अनेकांच्या अंगावर शहारे येत आहेत. तर अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्कादेखील बसला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर या महिलेचे साप पकडण्याचे रोजचे काम आहे की काय? असा प्रश्नही लोकांना पडला आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ X प्लॅटफॉर्म म्हणजेच आधीचे ट्विटरवर @Insane Reality Leaks नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ऑस्ट्रेलियातील आणखी एक सामान्य दिवस.” त्यामुळे व्हिडीओ शेअर करण्याला व्यक्तीला ऑस्ट्रेलियामध्ये अशा घटना अनेकदा घडत असल्याचं सुचित करायचं आहे.
आत्तापर्यंत हा व्हिडिओला ७ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेक लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तर बऱ्याच नेटकऱ्यांनी व्हिडीओत दिसणाऱ्या मुलीच्या धाडसाचे कौतुक केलं आहे. एका युजरने लिहिलं आहे, “हे दृश्य खूप भयानक आहे.” तर आणखी एकाने “ही महिला असामान्य आहे” असं लिहिलं आहे.