World largest Whisky Bottle: जगातील सर्वात मोठ्या व्हिस्कीच्या बाटलीचा लिलाव नुकताच पार पडला. ही बाटली ५ फूट ११ इंच लांब असून त्यात ३११ लिटर व्हिस्की भरलेली आहे. अखेर या बाटलीचा ऑनलाइन विक्रीत लिलाव करण्यात आला.
किंमत किती?
स्कॉच व्हिस्कीची ही जगातील सर्वात मोठी बाटली आहे. त्याची किंमत सुमारे १.४ मिलियन डॉलर अर्थात १०,८५,८८,९०० रुपये आहे. याची बोली ऑनलाइन लावण्यात आली. अखेर एका आंतरराष्ट्रीय अज्ञात कलेक्टरने ते विकत घेतले.
(हे ही वाचा: IPL 2022: एक लाखांहून अधिक लोकांनी एकाच वेळी गायले “वंदे मातरम्”, अंगावर काटा आणणारा Video Viral)
(हे ही वाचा: “तो निर्णय वरकरणी कितीही सोपा वाटत असला तरी…”; पत्नीसाठी रोहित पवारांची भावनिक पोस्ट, कारण…)
३२ वर्ष जुनी आहे बाटली
या व्हिस्कीला ‘द इंट्रेपिड’ असे नाव देण्यात आल्याचे लिलाव कंपनीने सांगितले. हे सिंगल-माल्ट सुमारे ३२ वर्षे जुने आहे. याला १९८९ मध्ये स्पेसाइडच्या प्रतिष्ठित द मॅकलन येथे डिस्टिल्ड केले गेले. या व्हिस्की बाटलीची नोंद सप्टेंबर २०२१ मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. या बाटलीमध्ये सुमारे ४४४ व्हिस्कीच्या बाटल्यांएवढी दारू असल्याचा दावा केला जात आहे.