स्वयंचलित टॅक्सी, बस नंतर आता स्वयंचलित ट्रक देखील रस्त्यावर उतरवण्याचा प्रयोग केला जाणार आहे. सध्या या ट्रकची चाचणी सुरू आहे. स्वीडनच्या क्रिस्टीनबर्ग येथील खाणीमध्ये या ट्रकची चाचणी सुरू आहे. वॉल्वो कंपनीने हा ट्रक बनवला आहे. विशेष म्हणजे फक्त खाणीत चालवण्यासाठी हा ट्रक बनवण्यात आला आहे. जमीनीच्या खाली १ हजार ३२० मीटर खोल असलेल्या खाणीत याची चाचणी करण्यात आली. सात किलोमीटरपर्यंत हा ट्रक चालवला गेला. खाणीत खनिजांची ने आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रकचा वापर होतो. पण बरेचदा ट्रक चालवताना चालकाला अनेक समस्येला तोंड द्यावे लागते. खाण जितकी खोल असेल तितकी चालकाची समस्या मोठी. अनेकदा अपघात झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंचलित ट्रक बनवण्याचा या कंपनीचा मानस आहे.
या चाचणीचा एक व्हिडिओ या कंपनीने बनवला आहे. जमीनीखाली खोल भुयारात हा ट्रक अगदी नीट चालत आहे. त्यामुळे ही चाचणी जर यशस्वी झाली तर लवकरच स्वयंचलित ट्रक देखील वापरात येतील. पण स्वयंचलित वाहानात चालक नसल्यामुळे अपघात वाढतील अशी भिती अनेकांकडून व्यक्त केली जात होती. पण या चाचणीत देखील हा ट्रक उत्तीर्ण झाला आहे. या ट्रकसमोर माणूस आला पण त्यावेळी या ट्रकमध्ये असलेल्या सेन्सॉरमुळे आपसूकच ब्रेक लागले. सध्या अनेक परिक्षणामधून हा ट्रक जात आहे त्यामुळे प्रत्यक्षात ही कल्पना यायला थोडा अवधी लागणार आहे.
VIDEO : खाणीत चालणारा स्वयंचलित ट्रक
स्वयंचलित टॅक्सी, बस नंतर आता स्वयंचलित ट्रक देखील रस्त्यावर उतरवण्याचा प्रयोग केला जाणार आहे. सध्या या ट्रकची चाचणी सुरू आहे. स्वीडनच्या क्रिस्टीनबर्ग येथील खाणीमध्ये या ट्रकची चाचणी सुरू आहे. वॉल्वो कंपनीने हा ट्रक बनवला आहे. विशेष म्हणजे फक्त खाणीत चालवण्यासाठी हा ट्रक बनवण्यात आला आहे. जमीनीच्या खाली १ हजार ३२० मीटर खोल असलेल्या खाणीत याची […]
Written by लोकसत्ता टीम
First published on: 20-09-2016 at 15:38 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The worlds first self driving truck