Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. अनेक जण आपल्या कला सादर करतात तर काही लोक त्यांना आलेले चांगले वाईट अनुभव शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पुण्यातील एफसी रोडवरील आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये डस्टबिन बॅग विकणाऱ्या एका चिमुकल्याशी एक तरुण संवाद साधताना दिसतोय. या तरुणाने या व्हिडीओमध्ये त्याच्या आयुष्यातील संघर्षाविषयी सांगितले आहे. पुण्यातील या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –

तरुण – काय नाव आहे?
चिमुकला – आरबाज शेख
तरुण – काय करतो?
चिमुकला – काही नाही, डस्टबिन बॅग विकतो.
तरुण – शाळेत वैगरे जातो का?
चिमुकला – हो जातो ना
तरुण – कितवीत आहे?
चिमुकला – नववीत आहे
तरुण – कोणत्या शाळेत जातो?
चिमुकला – प्रकाशन इंग्लीश मीडियम स्कूल
तरुण – तुझी रोजची दिनचर्या कशी असते?
चिमुकला – सकाळी उठायचं शाळेला जायचं मग दोन वाजता हे विकायला यायचं, बारा वाजता घरी जायचं
तरुण – काय विकतो?
चिमुकला – डस्टबिन बॅग
तरुण – किती रुपयांना विकतो?
चिमुकला – १०० रुपयांना पाच
तरुण – स्वत:हून विकतो की कोणी…
चिमुकला – स्वत:हून.. घरच्या परिस्थितीमुळे
तरुण – घरची परिस्थिती कशी आहे?
चिमुकला – पप्पा वारले म्हणून मम्मी एकटी सांभाळते, चांगलं नाही वाटत मला म्हणून मी पण येतो विकायला.
तरुण – आईला विचारलं का?
चिमुकला – हो आई म्हणाली विकत जा. तेवढीच मदत होईल घरात
तरुण – आई काय करते?
चिमुकला – आई कामाला आहे पिंड पंजाबमध्ये
तरुण – काय काम आहे?
चिमुकला – भांडे धुवायला, हॉटेल आहे ते.
तरुण – आवड कशात आहे तुला आवड?
इतिहास
तरुण – पुण्यातल्या इतिहासांबद्दल काय काय माहिती आहे तुला?
चिमुकला – लाल महाल विषयी माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं.
तरुण – तुझ्या आयुष्यात मोटिव्हेशन कोणाला मानतोस तु?
चिमुकला – आईलाच आईच म्हणते खूप चांगलं शिकायचं म्हणून.

पाहा व्हायरल व्हिडीओ

inside.hindu या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यात एफसी रोड वर डस्टबिन बॅग विकणारा आरबाज”या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “छत्रपती श्री शिवाजी महाराज” यांच नाव घेतलस तिथेच मन जिंकलास..#जात धर्म सोडून पुण्यात राहून महाराजांच नाव घेतलं म्हणून.” तर एका युजरने लिहिलेय, “सर्व पुणेकर मित्रांना विनंती पैसे असेल की आणि एफसी रोडवर जर हा दिसला तर ह्याच्या कडून बॅग नक्की घ्या. कष्ट कष्ट आणि कष्ट” आणखी एका युजरने लिहिलेय, “छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास बदल बोलला खूप छान वाटलं तुझी मराठीत पण खूप छान बोललास तुझं बोलणं बघून डोळ्यातून पाणी आलं” एक युजर लिहितो, “लेकराला नक्की कष्टाच फळ मिळेल.आईच्या कष्टाची जाणीव आहे” तर एका युजरने लिहिलेय, “खूप कमी वयात खांद्यावर जबाबदारी घेतलेला मुलगा” असंख्य युजर्सनी या चिमुकल्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.