तुमच्या आवडीला तुमचे करिअर म्हणून निवडलं तर यश पायात लोळतं असे म्हणतात. असेच काहीसे या तरुण बंगाली मुलीसह झाले आहे. फेसबूकवर या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वडिलांचा व्यवसाय बंद झाल्यानंतर या मुलीने अधिक पैसे कमाविण्यासाठी रस्त्यावर खाद्यपदार्थांचा स्‍टॉल सुरू केला आणि आजच्या तारखेला कोलकाता येथील नंदिनी गांगुलीच्या हातच्या बंगाली फूडने सर्वांना वेड लावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोण आहे ही फूड स्टॉल गर्ल

कोलकाता येथील स्ट्रीट फूड विक्रेत्या नंदिनी गांगुलीची गोष्ट प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारी आहे, तिच्या संघर्षापासून ते यशापर्यंतचा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. फूड स्टॉल असलेल्या कोलकात्याच्या तरुणीची सोशल मिडियावर खूप चर्चा होत आहे.

फॅशन डिझायनर झाली स्ट्रीट फूड विक्रेता

आज कोलकात्यामध्ये नंदिनीचे नाव प्रसिद्ध आहे. रस्त्याच्या बाजूला आपल्या खाद्यपदार्थांचा स्टॉल उभारूनच तिला हे यश मिळाले. फॅशन डिझाईनिंगचे शिक्षण घेतल्यानंतर ती नोकरी करत होते पण कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी तिने नोकरी सोडली आणि रस्त्यावर उभं राहून खाद्यपदार्थाचा स्टॉल लावण्याचा निर्णय घेतला.

वडिलांचा व्यवसाय बंद झाल्यावर त्यांनी पारंपरिक बंगाली थाळींचा लावला स्टॉल

नंदिनीच्या वडिलांचा रबरचा व्यवसाय होता, जो कोरोनामुळे लॉकडाऊन दरम्यान त्यांना तो बंद करावे लागला. कठीण प्रसंगामुळे नंदिनीने तिच्या पालकांना फूड स्टॉल चालवण्यात मदत करण्यासाठी नोकरी सोडली. ती आता फूड स्टॉलवर पारंपारिक बंगाली थाळी तयार करते आणि वाढते. यातून ती चांगली कमाई करत आहे

हेही वाचा : फळविक्रेत्या महिलेची कामगिरी पाहून आनंद महिंद्रा झाले फॅन; ‘या’ एका कृतीला पाहून म्हणाले, ‘यांचा पत्ता सांगा’

लोकांना नंदिनीची शैली आवडते

फॅशन डिझायनर असलेली नंदनी जेव्हा फूड स्टॉलवर उभे राहून खाद्यपदार्थ विकते तेव्हा आजही तिच्या उत्तम ड्रेसिंग सेन्स आणि मेकअपमुळे लोकांना तिच्याकडे निरखून, काळजीपूर्वक पाहण्यास भाग पाडते. नंदिनी मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने जेवण देते. म्हणूनच जर कोणी एकदा त्यांच्या स्ट्रीट फूड स्टॉलवर बसून अन्न खातात, तर तो पुन्हा पुन्हा इथे येतो.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली

सर्वात लोकप्रिय फूड ब्लॉगरने जेव्हा तिच्या स्टॉलचा व्हिडिओ बनवला तेव्हा नंदिनी सोशल मीडियावर प्रचंड हिट झाली. यानंतर, आणखी व्लॉगर्स व्हिडिओ बनवायला आले आणि तिला हे कळण्याआधीच ती सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली होती

जेवणाच्या थाळीची किंमत काय आहे ते जाणून घ्या

नंदिनी तिच्या स्टॉलवर दिलेले विविध पदार्थ धुण्यासाठी, सोलण्यासाठी, कापण्यासाठी आणि शिजवण्यासाठी सकाळी लवकर तिच्या स्टॉलवर पोहोचते. ती फक्त ताजे अन्न विकते. त्यांच्या स्टॉलवर शाकाहारी थाळी 30 ते 40 रुपये आणि मांसाहारी चिकन थाळी 100 रुपये आणि मटण थाळी 200 रुपये आणि फिश थाळीची किंमत 70 ते 80 रुपये आहे.

हेही वाचा : आईस्क्रीमच्या काडीपेक्षा लहान कुत्रा पाहिलंय का? गिनिज बुकने दिला हा मोठा मान

पारंपारिक बंगाली पदार्थ लोकांना खूप आवडतात

नंदिनीच्या स्टॉलमध्ये बंगाली पदार्थ जसे की आलू चोखा, तांदूळ, मूग डाळ, आलू फ्राय भोपळा आलू, वडीसोबत वांग्याची भाजी, भजी, आलू भाजा, वांग्याचा भाजा, कढी, माछेर झोल, चिकन करी, मटण करी आणि बरेच पदार्थ समाविष्ट आहेत.

व्हिडिओ व्हायरल होत आहेत

फेसबुकवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे 8 मीलियनपेक्षा जास्तवेळा हा व्हिडिओ पाहिला आहेत, ज्यावर लोक प्रतिक्रिया देत आहे.

एकाने लिहिले, महिला सशक्तिकरण… गुड लक मॅडम.

एकाने लिहिलेले कोलकता का स्वाद. प्रसिद्ध स्ट्रीट लंच डिनर आणि नाश्ता. आणखी एकाने लिहिले की, खूप मेहनती महिला, हे कायम ठेव देव तुझे भलं करो

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The young girl from kolkata is a popular street food vendor now snk
Show comments