Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेले विविध व्हिडीओ आपण पाहत असतो. त्यात बऱ्याचदा लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांबरोबरचे व्हिडीओदेखील शेअर करीत असतात. या व्हिडीओंमध्ये अनेकदा लोक आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांबरोबर खेळताना, तर कधी मजामस्ती, तर कधी भांडण करतानाही दिसतात. पण, तुम्ही कधी कोणत्या व्यक्तीला वाघाबरोबर खेळताना पाहिलं आहे का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक तरुणी चक्क वाघाबरोबर असं काहीतरी करतेय, जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
वाघ म्हटलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. आपल्या आसपासच्या परिसरात वाघ फिरत असल्याची बातमी जरी कळली तरी लोक घराबाहेर पडायला घाबरतात. फक्त लोकच नाही तर जंगलातील इतर प्राणीदेखील वाघापासून स्वतःचा जीव कसा वाचवता येईल यासाठी अनेक प्रयत्न करीत असतात. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी पाण्यात चक्क वाघाबरोबर खेळताना दिसतेय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी स्विमिंग पूलमध्ये पोहत आहे. यावेळी एक वाघही तिच्याबरोबर पोहताना दिसतोय. त्या वाघाने त्या तरुणीला मिठी मारली असून, ती तरुणी चक्क वाघाचे चुंबन घेत आहे आणि पुढे दोघेही फोटोसाठी पोज देतात. हा व्हिडीओ शेअर करीत तिने कॅप्शनमध्ये, “माझा टायगर मित्र लक्ष्मण”, असे लिहिले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @rio_lilly अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या अकाउंटवर या तरुणीने इतर प्राण्यांसोबतचेही व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. या व्हिडीओवर आतापर्यंत दोन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “मलादेखील या जागेवर जायला आवडेल.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “रशियन डॉल तिच्या वाघासोबत.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “अगं, लांब हो त्याच्यापासून; नाही तर तो तुला खाऊन टाकेल.” इतर युजर्सही हा व्हिडीओ पाहून खूप घाबरल्याचे सांगत आहेत.
दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाला होता; पण त्यामध्ये एक लहान मुलगी एका अजगराबरोबर खेळताना दिसली होती. हा थरारक व्हिडीओ पाहूनही नेटकरी खूप घाबरले होते.