Viral Video :- सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होताना दिसत असतात; ज्यात तुम्ही अनेक प्राणी, लहान मुले, भांडण, वयस्कर व्यक्ती आदींसंबंधीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण, आज एका व्हिडीओत तरुण किंवा वयस्कर व्यक्ती नाही, तर चक्क अपंग व्यक्ती व्हीलचेअरच्या मदतीने एक अदभुत स्टंट करताना दिसत आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका मोठ्या मैदानात स्पर्था चालू आहे. स्पर्धेसाठी उपयोगी अशा गोष्टी या मैदानात तुम्हाला मांडलेल्या दिसतील.उंच स्लाईडवर एक व्यक्ती व्हीलचेअरवर बसलेली तुम्हाला दिसेल. बघता बघता, ही व्यक्ती व्हीलचेअर हाताने चालवत, इतक्या उंचावरून स्लाइडच्या मदतीने खाली येताना तुम्हाला व्हिडीओत दिसेल. त्यानंतर ही व्यक्ती व्हीलचेअरसोबत हळूहळू स्लाडवरून खाली येताना उंच हवेत गोल फिरून,व्हीलचेअरवर स्वतःच नियंत्रण ठेवून, जमिनीवर एका स्थिर जागी येऊन थांबते. खास गोष्ट अशी की, यादरम्यान व्यक्तीचा एकदाही तोल जात नाही. स्टंट पूर्ण होताच हा क्षण टिपणारे काही कॅमेरामनसुद्धा या व्यक्तीच्या मागे धावत जाताना तुम्हाला दिसतील. तसेच ही व्यक्ती स्टंट पूर्ण करताच आनंद व्यक्त करतानाही दिसत आहे. स्टंट करणाऱ्या व्यक्तीचे सोबती, प्रेक्षक, कॅमेरामन या व्यक्तीपाशी जाऊन त्याचे अभिनंदन करतात आणि त्याच्या हिमतीला दाद देताना दिसत आहेत. एकदा तुम्हीसुद्धा बघाच- त्या व्यक्तीने व्हीलचेअरचसोबत केलेला हा अनोखा स्टंट.
हेही वाचा :- बेरोजगारीत इन्स्टाग्रामवर फुललं प्रेम; OYO रुमवर सात जन्माची वचने, नोकरी लागताच तरुण म्हणतो तू कोण?
नक्की बघा व्हिडीओ :-
हा व्हिडीओ (Humans No Context) या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ बघून ‘असा स्टंट करण्याचे काही लोक फक्त स्वप्नच बघू शकतात’, असे म्हणत आहेत. तर काही जण ‘ या व्यक्तीनं हा स्टंट इतक्या सहज केलाच कसा?’ असे आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत. बाकीचे विविध शब्दांत व्हिडीओतील व्यक्तीच कौतुक करताना व्हिडीओच्या कमेंटमध्ये दिसून येत आहे. एखादी व्यक्ती व्हीलचेअरच्या मदतीने एवढ्या मोठ्या स्लाइडवरून खाली येऊन हा स्टंट यशस्वीरीत्या पूर्ण करते हे बघून कोणालाही आश्चर्य वाटेल हे नक्कीच.