आजकाल मोबाईल ही सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट बनली आहे. अनेकांना मोबाईलपासून दूर राहणं अजिबात जमत नाही. मोबाईल जवळ नसेल तर लोकांना अस्वस्थ वाटू लागते. त्यामुळे आता नकळत का होईना लोकांना मोबाईलचं व्यसन लागलं आहे. मोबाईलसाठी ते काहीही करु शकतात. कोणत्याही थराला जाऊ शकतात, याचेच एक ताजं उदाहरण समोर आलं आहे. ते म्हणजे एका तरुणाचा मोबाईल टॉयलेटमध्ये पडला म्हणून त्याने चक्क गटारात उडी मारल्याची घटना उघडकीस आली आहे.

…अन् तरुणाने थेट गटारात उडी मारली –

Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Meenakshi Seshadri Romantic rain song while she having diarrhea
सेटवर एकच शौचालय, पावसात रोमँटिक गाण्याचं शूटिंग अन्.., मीनाक्षी शेषाद्रीने सांगितला अतिसार झाल्यावर चित्रीकरणाचा वाईट अनुभव
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?

हेही वाचा- धक्कादायक! जहाजातील सार्वजनिक टॉयलेटमध्ये प्रवाशाने लावला छुपा कॅमेरा; १५० पेक्षा जास्त लोकांचे रेकॉर्डिंग आले समोर

मिळालेल्या माहितीनुसार ब्राझीलमधील एका तरुणाने त्याचा iPhone 12 Max टॉयलेटमध्ये पडला, म्हणून तो काढण्यासाठी थेट गटारात उडी मारली. त्याला त्याचा आयफोन मिळाला मात्र, गटारात उडी मारल्यामुळे त्याला जे भोगायला लागलं आहे ते तो आयुष्यभर विसरणार नाही. ब्राझीलमधील हिप-हॉप महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑगस्टो फिगुएरेडो नावाचा तरुण गेला होता. यावेळी त्याचा आयफोन टॉयलेटमध्ये पडला. टॉयलेटमध्ये पडलेला फोन काढणाऱ्याला त्याने ४०० डॉलर देण्याची घोषणा देखील केली होती, मात्र तरीही टॉयलेटमधील मोबाईल काढण्याचं धाडस कोणी केलं नाही. त्यामुळे त्याने स्वतः गटारात उडी मारली.

हेही पाहा- आधीच दारुची नशा त्यात GPS मुळे चुकली दिशा; २ महिला कारसह थेट समुद्रात गेल्याचा मजेशीर Video व्हायरल

ऑगस्टो फिगुएरेडोने सांगितलं की, अनेक प्रयत्नांनंतर त्याला त्याचा ११०० डॉलर किमंतीचा आयफोन सापडला. आश्चर्याची बाब म्हणजे गटारात पडल्यानंतरही त्याचा फोन सुरु होता. दरम्यान, या तरुणाला त्याचा फोन परत मिळाला मात्र तो स्वत: आजारी पडला शिवाय त्याला इन्फेक्शनही झालं. गटारात उडी मारल्यानंतर ऑगस्टोलाही दुखापत झाली. शिवाय तो आजारी पडल्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. अनेक तास त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याने गटारात उडी मारल्यामुळे त्याच्या पायाला टाके पडल्याचीही माहिती समोर आली आहे.

रिपोर्ट्सनुसार, कोणत्याही सुरक्षेशिवाय गटारात उडी मारल्यामुळे ऑगस्टोचा मृत्यू देखील होण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने त्याचा फोनही वाचला आणि तो देखील सुखरुप बचावला. ऑगस्टो म्हणाला की, त्याच्या कुटुंबीयांनी कधीही तो गटारात उडी मारेल अशी अपेक्षा ठेवली नव्हती परंतु त्याने आयफोनसाठी उडी मारली.