कधी कोणाचा कसा अपघात होईल हे काही सांगता येत नाही. अचानक होणारे अपघात क्षणर्धात सर्व काही बदलून टाकतात. आपल्या आसपास अनेक अपघात होत असतात जे आपल्या अंगावर काटा आणणारे असतात. सोशल मीडियावर अपघाताचे थरारक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा असे घडते की भयानक अपघातातून लोक वाचतात किंवा कोणीतरी मदतीला धावून येतो. सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुणाबरोबर मोठा अपघात होणारच होता पण सुदैवाने तो थोडक्यात बचावला आहे.

इंस्टाग्रामवर swami_maharaj_status_1 या अकांउटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ एका जीममधील आहे जिथे काही तरुण व्यायाम करत आहे. काही तरुण बेंचवर बसले आहे. काही तरुण उभे आहे. एक तरूण बेंचवर बसलेला असून त्याचे लक्ष दुसरीकडे आहे. त्याच्या समोरील मशीनवर एका रॉडला खूप वजन लावले आहेत. वजनामुळे तो रॉड अचानक खाली पडतो आणि थेट तरुणाच्या डोक्यात पडणार असतो पण तेवढ्यात तिथे आलेला दुसरा तरुण तो रॉड पकडतो आणि तरुणाचा जीव वाचवतो.

Viral video of a fight between some local train passengers on a kandivali railway station is currently going viral on social media
कहरच! तरुणांनी मुंबईतील कांदिवली रेल्वे स्टेशनवर हद्दच पार केली; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral…
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
nitish kumar Rahul Gandhi fact check photo
बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुख्यमंत्री नितीश कुमार, तेजस्वी यादव अन् राहुल गांधीच्या VIRAL PHOTO मुळे चर्चांना उधाण; वाचा खरं काय?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
do you ever eat black idli
काळी इडली कधी खाल्ली आहे का? VIDEO होतोय व्हायरल
Shocking video: Guy Stole the phone in Broad Daylight while shopkeeper was busy in Doing Puja
“बापरे काय चोर आहे” चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; अशी चोरी केली की VIDEO पाहून अवाक् व्हाल
Man Serving Chai On IndiGo Flight Video
चाय ले लो चाय! तरुण चक्क विमानात विकू लागला चहा, video पाहून युजर्स शॉक; म्हणाले…
Man Tries to Help Girls Who Fell Off Scooty, But What Happens Next is Shocking
पापाच्या परींची मदत करायला गेला तरुण अन् होत्याचं नव्हतं झालं; VIDEO पाहून येईल अंगावर काटा

बेंचवर बसलेल्या तरुणाच्या शेजारी एक व्यक्ती उभा असतो त्याला पाहून तो जीव वाचवणारा तरूण त्याला भेटण्यासाठी पुढे येतो आणि त्याच्यासह हात मिळवतो. तो वळून पुढे जाणार तेवढ्यात तो रॉड जोरात आपटतो. तो तरूण थोडाही पुढे मागे झाला असता तर तो स्वत:ही जखमी झाला असता आणि बेंचवर बसलेला तरुणही जखमी झाला असता पण सुदैवाने असे काही होत नाही. रॉड पडल्यानंतर त्वरित तो रॉड हातात पकडतो आणि तरुणाचा जीव वाचवतो. तो तरुण पुढे आला नसता तर कदाचित त्या मोठी दुर्घटना घडली असती. म्हणतात ना…देव तारी त्याला कोण मारी!” या म्हणीची प्रचिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहे. अनेक लोक देवाचे आभार मानत आहे तर अनेक लोक तरुणाचे कौतूक करत आहे. व्हिडीओवर अनेकांनी कमेट केल्या आहेत. एक व्यक्तीने लिहिले आहे की, “देव कुठे आहे असे विचारता का? माणसा माणसात देव आहे.” तिसऱ्याने लिहिले की,” आपले कर्म चांगले असतील आणि मुखी देवाचे नाव असेल, तर आपले कोणीच काही बिघडवू शकत नाही. देवाला माहीत नाही, पण देवाच्या नामस्मरणामुळे सकारात्मक उर्जा मिळते, मनातील नकारात्मक विचार निघून जातात.”

Story img Loader