सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामुळे आपलं मनोरजंन होतं असतं मात्र, यातील काही व्हिडीओ असे असतात जे आपणाला काहीतरी शिकवून जातात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विनाकारण प्राण्यांची छेड काढणाऱ्या तरुणाला चांगला धडा मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला ‘कर्म तैसे फळ’ ही म्हण नक्कीच आठवेल, कारण या म्हणीला साजेशी घटना या व्हिडीओत घडली आहे. सोशल मीडियावर मुक्या प्राण्यांचे आणि माणसांमधील प्रेमळ नात्याचे अनेक व्हिडीओ आपण पाहात असतो. मात्र, असे अनेक लोक असतात जे मुक्या प्राण्यांना विनाकारण त्रास देतात आणि त्यांच्याशी गैरवर्तन करतात. पण असं करणाऱ्यांना त्यांच्या कर्माचे फळही लगेच भेटते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये एका तरुणाला विनाकारण बैलाला त्रास देणं महागात पडलं आहे.
या व्हिडीओमध्ये अनेक बैल रेसिंग ट्रॅकवर धावताना दिसत आहेत. या बैलांची शर्यत पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचंही या व्हिडीओत दिसत आहे. या वेळी एक तरुण पुढे जातो आणि धावणाऱ्या एका बैलाला हाताने मारतो. पण बैलाला मारणं त्याला चांगलच महागात पडलं आहे जे व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल.
व्हिडिओ व्हायरल –
हेही पाहा- टीव्हीचा रिमोट नाही, चांगझोऊ विद्यापीठाने बनवलाय किसिंगचा रिमोट, व्हायरल Video पाहून थक्क व्हाल
या घटनेचा व्हिडीओ GaurangBhardwa1 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये, “झटपट कर्माचे फळ” असं लिहिलं आहे. या व्हिडीओवर अनेकजण वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिले की, हे कर्माचे फळ आहे, दुसरं काही नाही, असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने हा तरुण आतापासून ते कोणत्याही मुक्या प्राण्याला त्रास देणार नाही, असं म्हटलं आहे.