जेव्हा एखादी व्यक्ती कोणाच्या तरी प्रेमात पडते तेव्हा तिला किंवा त्याला प्रपोज कसे करायचे, असे अनेक प्रश्न त्या व्यक्तीला पडतात. यासाठी अनेकजण चित्रपटांमध्ये दाखवलेले प्रपोज करतानाचे स्टंट करण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रपोज करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक तरुण एक तरुणीला प्रपोज करण्यासाठी एक फिल्मी स्टाईल स्टंट करतो पण पुढल्याच क्षणी त्यासोबत असे काही घडते की तो स्वतः जमिनीवर पडतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
प्रपोज करण्याच्या नादात तोंडावर पडला
@stylishalam_ नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. मुलीला प्रपोज करण्यासाठी तरुण स्टंट करण्याचा प्रयत्न करतो पण त्यात तो कसा अपयशी ठरतो हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण काही अंतरावर उभ्या असलेल्या एका तरुणीला प्रपोज करण्यासाठी बाईक घेऊन स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. मात्र तो स्टंट करणार तितक्यात असे काही होते की त्याचा बाईकवरून तोल सुटतो आणि तो खाली पडतो. समोर उभी असलेली मुलगी त्याला अशाप्रकारे पडलेला पाहून बघतच राहते.
( हे ही वाचा: Video: लग्नात बेभान नाचत होती ‘ही’ महिला; उड्या मारत असा डान्स केला की पाहुणेही झाले फिदा)
येथे व्हिडिओ पाहा
( हे ही वाचा: ट्रेनच्या अप्पर सीटवरून खाली येण्यासाठी लहान बाळाची ‘निंजा टेक्निक’, रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ Video एकदा बघाच)
हा व्हिडीओ सोशल मीडियावर १९ दशलक्ष पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला असून याला जवळपास ३ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसंच हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट्स देखील केल्या आहेत, ज्या पाहिल्यानंतर तुम्हीही स्वतःला हसण्यापासून रोखू शकणार नाही. एका यूजरने लिहिले आहे की, त्याला मोठा हिरो बनण्याची आवड होती, आता खूप मजा आली असेल. याशिवाय अनेकांनी विचित्र कमेंट्स केल्या आहेत. हा प्रोपोज त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील असे एका यूजरने लिहिले आहे.