सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुलींचा एक ग्रुप चालत्या ट्रेडमिलवर गरबा करताना दिसत आहे. त्या डमिलवर गरबा स्टेप्स करत आहेत. या मुलींनी गुजरातचा पारंपारिक पोशाख घातला आहे. तसेच, या मुलींच्या एकसंगत गरबा स्टेप्स पाहून प्रत्येकजण मंत्रमुग्ध झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गरबा वर्ल्ड या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून तो २ मिलियनपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. तथापि, इंटरनेट युजर्सनी असेही म्हटले आहे की जर एखाद्याने तोल गमावला तर ट्रेडमिलवर असे करणे धोकादायक ठरू शकते.

तुम्ही आत्तापर्यंत अनेक गरबा परफॉर्मन्स पाहिले असतील पण हे त्या सर्वांपेक्षा वेगळे आहे कारण या मुली ट्रेडमिलवर गरबा करताना दिसत आहेत. हे खरं तर आश्चर्यकारक आहे की त्या गरबा सादर करताना अजिबात चुकल्या नाहीत आणि त्यांनी गरबा सुरूच ठेवला.

हा व्हिडीओ धक्कादायक असला तरीही लोकांना प्रेरणाही देतो की एकाग्रता असेल तर सर्वात कठीण काम सहज करता येते. हे पाहून जीममध्ये व्यायाम करणाऱ्या प्रशिक्षकांनाही आश्चर्य वाटले. सहसा लोक मोकळ्या मैदानात गरबा खेळतात.

२५ वर्षाच्या मुलीने ६० वर्षाच्या वृद्धासोबत केलं लग्न; लग्नानंतर तरूणीचे दिलेली रिअ‍ॅक्शन व्हायरल

काहींनी नर्तकांच्या समन्वयाची प्रशंसा केली, तर काहींनी त्यांच्यासाठी ते किती धोकादायक असू शकते याकडेही लक्ष वेधले. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, ‘ट्रेडमिलवर स्कर्ट घालणं सुरक्षित नाही, कारण तो कुठेही अडकू शकतो.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘असे करणे धोकादायक आहे, कापड अडकले तर मोठा अपघात होऊ शकतो.’

सोशल मीडियावर लोक या व्हिडीओला खूप पसंत करत आहेत. garba__world नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला असून लोकांना तो खूप आवडला आहे.