Snake Video Viral: विषारी नागाचा फोटो जरी आपल्या डोळ्यांसमोर आला तरी आपली घाबरगुंडी उडते. साप, नाग, अजगर या सर्व जातींना अनेक जण घाबरतात यात काही नवल नाही. अनेकदा सोशल मीडियावर यांचे अनेक व्हिडीओ, फोटोदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्यामध्ये अनेकदा काही लोक या प्राण्यांबरोबर मस्ती करताना दिसतात. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजपर्यंत सोशल मीडियावर तुम्ही असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील; ज्यात काही लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, प्राण्यांबरोबर स्टंट करताना दिसले आहेत. कधी वाघ, तर कधी बिबट्या या प्राण्यांच्या जवळ जाऊन लोक आपलं आयुष्य पणाला लावतात. आताही असाच एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यात एक तरुणी अजगराबरोबर मस्ती करताना दिसतेय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक रशियन डान्सर हातामध्ये अजगराला पकडून डान्स करता करता, त्याचं चुंबन घेण्याचा प्रयत्न करते. परंतु, त्यावेळी अचानक अजगर तिच्या नाकाचा चावा घेतो, डान्सर तरुणी सावध होऊन पटकन त्याला बाजूला करून, खाली सोडून देते. तरुणीने केलेली मस्ती तिच्याच अंगलट आली. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत असून, नेटकरी अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @brutamerica नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. अनेक जण त्यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “तिला काय गरज होती त्याचं चुंबन घेण्याची.” दुसऱ्याने लिहिलेय, “कुठून हिंमत येते या लोकांमध्ये.” तिसऱ्याने लिहिलेय, “बापरे! खूप भयानक.”