Mumbai AC Local viral video: मुंबईत दरदिवशी मोजणंही अशक्य होईल इतकी मंडळी रेल्वेनं प्रवास करतात. पण, या सेवेचा फायदा घेत असताना किमान दरात उपलब्ध असणारी तिकिटं काढणंही बऱ्याचदा टाळलं जातं. एसी लोकलमध्येही हल्ली असा फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बस प्रवास, रेल्वे प्रवासात वादविवाद होणे काही नवीन नाही. अनेकदा तिकिटावरून कंडक्टर, टीसीशी वाद झाल्याच्या घटना पाहायला, ऐकायला मिळतात. अनेकदा हा किरकोळ वाद थेट हाणामारीपर्यंतही जातो. सध्या मुंबईतल्या एसी लोकलमधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या एसी लोकलमध्ये चढलेल्या तरुणींचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकलमध्ये दोन तरुणी प्रवास करत होत्या. यादरम्यान काही प्रवाशांनी त्यांना एसी लोकल असल्याची माहिती दिली. त्यानंतर तिथे टीसीही आले. यावेळी या तरुणी प्रचंड गोंधळलेल्या दिसत होत्या, कारण या तरुणी मुंबईच्या रहिवासी नव्हत्या तर गावावरून आलेल्या होत्या. सध्या मुंबईमध्ये पोलिस भरती सुरू आहे, याच पोलिस भरतीसाठी या मुली आल्या असताना त्यांना माहिती नसल्यामुळे त्या एसी लोकलमध्ये चढल्या. दरम्यान, टीसी आल्यावरही त्यांना काय उत्तर द्यावे हे कळत नव्हते, तेव्हा इतर प्रवाशांनी त्या तरुणी पोलीस भरतीसाठी आल्याचं सांगितलं.

हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरने या प्रकरणाची माहिती देताना म्हंटलंय की, या तरुणी गोंधळलेल्या अवस्थेत असताना टीसी त्यांच्याकडून अतिरिक्त दंड वसूल करणारच होता तेवढ्यात काही प्रवाशांनी त्यांना मुलींची बाजू सांगितली. “ही मुलं गावाकडून येऊन संघर्ष करणारे नवोदित तरुण आहेत, हातावर पोट असलेल्या कुटुंबातून आलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो पोलीस भरतीसाठी अशी मुलं दिसली तर त्यांना नक्की मदत करा,” असं आवाहन या युजरने व्हिडीओ शेअर करत केलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “ताकदीचा माज इतकाही बरा नाही”; समुद्राच्या लाटेने तरुणाचं काय केलं पाहा; थरारक VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर im_prasad09 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, या मुली खरंच प्रामाणिक होत्या, मात्र एसी लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. एकीकडे महिन्याला प्रवास सुकर व्हावा याच हेतूनं पास किंवा अगदी एसी लोकलचं जास्त किंमत असणारं तिकीट काढून प्रवास करणारे प्रवासी प्रामाणिकपणे नियमांचं पालन करत असताना फुकट प्रवास करणारी मंडळी मात्र त्यांना या प्रवासातही मनस्ताप देताना दिसत आहेत. त्यामुळे आता रेल्वेस्थाकांमध्ये प्रवेश करतानाच तिकीट किंवा तत्सम प्रकारची यंत्रणा लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The young women who boarded the ac local without tickets were released by the tc know the reason behind video goes viral srk