तुमच्यापैकी अनेक जण सुट्यांच्या निमित्ताने किंवा काही कामानिमित्त पुणे-मुंबई महामार्गाने प्रवास करीत असतील, तर या महामार्गावरून जाताना तुम्ही आतापर्यंत अपघाताच्या घटना पाहिल्या असतील. पण, सध्या सोशल मीडियावर पुणे-मुंबई महामार्गावरील असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण- या व्हिडीओत चक्क भररस्त्यात चालत्या टेम्पोमागे एक व्यक्ती लटकून जात आहे आणि ती टेम्पोमधून चोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा दावा व्हिडीओत करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, पुणे-मुंबई महामार्गावरून रात्रीच्या वेळी अनेक भलेमोठे टेम्पो, अनेक लहान गाड्या वेगाने जात आहेत. त्यावेळी रस्त्याने धावणाऱ्या एका टेम्पोमागे एक व्यक्ती उभी असल्याचे दिसतेय. ही व्यक्ती आपला जीव धोक्यात घालून चोरी करण्याच्या उद्देशाने टेम्पोमागे लटकून जात असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओतील कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, पुणे-मुंबई महामार्गावर रात्री २.३६ च्या दरम्यान चोरी. सर्व ड्रायव्हर्स मित्रांना विनंती करण्यात येते की, आपापल्या जीवाची काळजी घ्यावी.

अटल सेतूवरील स्पोर्ट्स कार्सचा ‘तो’ Video होतोय तुफान व्हायरल; पाहून अनेकांनी व्यक्त केला संताप

दरम्यान, तो नक्की चोरीच्या उद्देशाने टेम्पोमागे लटकून प्रवास करीत होता की आणखी कशासाठी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, तुम्हीदेखील रात्रीच्या वेळी पुणे-मुंबई महामार्गावरून प्रवास करीत असाल, तर सावधानता बाळगा.

पुणे-मुंबई महामार्गावरून रात्रीच्या वेळी येथून अनेक लहान-मोठे ट्रक, टेम्पोची वाहतूक सुरू असते. अनेकदा या वाहनांमध्ये मुंबई आणि इतर ठिकाणी पोहोचवण्याच्या विविध प्रकारच्या वस्तू असतात. किंवा विविध कंपन्यांचे सामान असते. यामध्ये संधी शोधून, त्याचा गैरफायदा घेत अनेकदा चोरीच्या घटना घडतात. त्यामुळे ट्रकचालक आणि टेम्पोचालकांनी पुणे- मुंबई महामार्गावरून प्रवास करताना काळजी घ्या.