गेले काही दिवस बॉलीवूडसाठी चांगले ठरले नाहीत. काही चित्रपट वगळता बाकी सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले आहेत. द काश्मीर फाइल्स, भूल भुलैया २ आणि गंगूबाई काठियावाडी हे काही मोजकेच बॉलिवूड चित्रपट हिट ठरले आहेत, तर कंगनाचा धाकड, आमिर खानचा लाल सिंग चड्ढा, अक्षय कुमारचा बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज आणि रक्षाबंधन, रणबीर कपूरच्या शमशेरासह अनेक मोठ्या कलाकारांचे चित्रपट मात्र फ्लॉप ठरले. दुसरीकडे, साऊथच्या आरआरआर, केजीएफ २, पुष्पा या चित्रपटांनी जोरदार कमाई केली. दरम्यान, सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलिवूड या ट्रेंडमुळेही हिंदी चित्रपटसृष्टीचं आर्थिक गणितही कोलमडलं आहे

दरम्यान, नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेता अनुपम खेर यांनी द काश्मीर फाइल्स हिट होण्यापासून ते बॉयकॉट बॉलिवूड या लेटेस्ट ट्रेंडपर्यंत अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, तुमची कथा चांगली असेल तर प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये जाऊन तुमचा चित्रपट पाहतील. याउलट तुमच्या चित्रपटाची कथा चांगली नसेल, पण त्यामध्ये मोठा कलाकार काम करत असेल, तरीही तुमचा चित्रपट चालणार नाही. ते पुढे म्हणाले, “केवळ १८ कोटींमध्ये तयार झालेला द काश्मीर फाइल्स या वर्षात सर्वांत हिट चित्रपट ठरला, मात्र या तुलनेने बिग बजेट चित्रपट सुपरफ्लॉप ठरले. कदाचित लोकांना त्यांना जे हवे आहेत ते मिळत नाही आहे.”

मैत्रिणीसोबत कारमध्ये सापडलेल्या भाजपा नेत्याला बायकोने रस्त्यावरच चप्पलने झोडपलं; Video होतोय व्हायरल

जेव्हा त्यांना विचारण्यात आले की चित्रपट फ्लॉप होण्यामागचे कारण काय असू शकते, तेव्हा अनुपम खेर म्हणाले की, करोना काळात प्रेक्षकांनी ओटीटी तसेच इतर देशातील चित्रपट, असे खूप काही पाहिले आहे. अशातच मागील वर्षांमध्ये खूप काही बदलले आहे. ते म्हणाले की आपल्याला बनावट चित्रपट बनवायचे आहेत का? की आपल्याला असे काहीतरी करायचे आहे जे वास्तविक आणि भारतावर केंद्रित आहे, कारण दक्षिणेकडील तिन्ही चित्रपट भारतावर केंद्रित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमोशनमुळे ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सुपरहिट झाल्याच्या प्रश्नावर, अनुपम खेर यांनी बिनधास्तपणे सांगितले की, जर हा चित्रपट मोदीजींच्या प्रमोशनने चालला असता तर मोदींच्या जीवनावर आधारित बनवण्याता आलेला बायोपिक सर्वात हिट चित्रपट ठरला असता.

Story img Loader